Iran New Hydrocarbon Natural Gas Discovery 
ग्लोबल

इराणच्या हाती लागला मोठा 'जॅकपॉट'! सापडला 7.5 ट्रिलियन क्यूबिक फीट गॅसचा महाखजिना; नव्या हायड्रोकार्बन साठ्याने अमेरिकेचे दणाणले धाबे

Iran New Hydrocarbon Natural Gas Discovery: मध्य पूर्वेतील सततचा युद्धजन्य तणाव, होर्मुज सामुद्रधुनीतील वाद आणि अमेरिकेकडून लागणाऱ्या कडक आर्थिक निर्बंधांच्या धमक्यांच्या सावटात इराणच्या हाती एक मोठा महाखजिना लागला.

Manish Jadhav

Iran New Hydrocarbon Natural Gas Discovery: मध्य पूर्वेतील सततचा युद्धजन्य तणाव, होर्मुज सामुद्रधुनीतील वाद आणि अमेरिकेकडून लागणाऱ्या कडक आर्थिक निर्बंधांच्या धमक्यांच्या सावटात इराणच्या हाती एक मोठा महाखजिना लागला. या नव्या शोधामुळे इराणची आर्थिक स्थिती अनेक पटींनी मजबूत होण्याचा मार्ग मोकळा झाला. जर इराणने योग्य रणनीती आणि नियोजनासह या नैसर्गिक संपत्तीचा वापर केला, तर तो जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत आपले स्थान निश्चित करु शकतो.

इराणचे मंत्री मोहसेन पाकनेजाद यांनी देशात हायड्रोकार्बनचे नवीन साठे सापडल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला असून, हे देशासाठी एका मोठ्या लॉटरीसारखे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इराणच्या (Iran) तेल मंत्र्यांनी अमेरिकेने लादलेल्या आर्थिक नाकेबंदी आणि दबावाला चोख प्रत्युत्तर दिले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील दक्षिण पार्स प्रदेशात 7.5 ट्रिलियन क्यूबिक फूटपेक्षा जास्त गॅसचे प्रचंड साठे आढळून आले. यातील सुमारे 5.7 ट्रिलियन क्यूबिक फूट गॅस प्रत्यक्ष वापर आणि उत्पादनासाठी बाहेर काढला जाऊ शकतो. हे नवीन साठे इराणच्या भविष्यातील ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत मैलाचा दगड ठरणार आहेत.

इराणने आपल्या मित्रराष्ट्रांच्या मदतीने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर शोधलेला हा हायड्रोकार्बनचा खजिना अशा वेळी समोर आला, जेव्हा अमेरिका आणि इतर अनेक पाश्चात्य देश इराणवर कठोर आर्थिक निर्बंध लादण्याच्या तयारीत होते.

अमेरिका आणि इराण यांच्यात 28 फेब्रुवारी 2026 पासून युद्धाची ठिणगी पडली. इराणने आपला अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे बंद करावा अशी अमेरिकेची मागणी आहे, परंतु इराण आपल्या भूमिकेवर ठाम असून ऊर्जा गरजांसाठी युरेनियम समृद्धीकरण करत असल्याचा दावा करत आहे. याच वादातून अमेरिकेने इस्रायलच्या साथीने इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हवाई हल्ले केले होते, ज्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने मध्य पूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा नवीन गॅस साठा इराणच्या अर्थव्यवस्थेला, ऊर्जा क्षेत्राला आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील त्याच्या स्थानाला मोठी ताकद देणारा ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT