Makkah Defence Deal Dainik Gomantak
ग्लोबल

Makkah Defence Deal: ''हा केवळ कागदाचा तुकडा, पाकिस्तान वाचवायला येणार नाही...'', मक्का संरक्षण करारावर इराण संतप्त; इस्लामिक नाटोवरुन मुस्लिम जगतात उभी फूट

Iran Slams Makkah Defence Pact Saudi Arabia: पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्की या तीन प्रमुख मुस्लिम देशांमध्ये मक्का येथे झालेल्या संरक्षण करारावरुन आता मुस्लिम जगतात उभी फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले.

Manish Jadhav

Iran Slams Makkah Defence Pact Saudi Arabia: पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्की या तीन प्रमुख मुस्लिम देशांमध्ये मक्का येथे झालेल्या संरक्षण करारावरुन आता मुस्लिम जगतात उभी फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले. इराणने या करारावर अत्यंत तीव्र शब्दात आक्षेप घेत सौदी अरेबियावर कडाडून टीका केली. इराणच्या संसदेचे आणि राष्ट्रीय सुरक्षा तसेच परराष्ट्र धोरण समितीचे सदस्य इब्राहिम रेझाई यांनी या कराराची कठोर निंदा केली असून, या करारामुळे सौदीची राजधानी रियाद दीर्घकाळ सुरक्षित राहू शकणार नाही, असा इशारा दिला.

रेझाई यांनी 'X' वर लिहित म्हटले की, सौदी अरेबियाने हे समजून घेतले पाहिजे की तुर्की आणि पाकिस्तानसोबत झालेला हा करार केवळ कागदाचा एक तुकडा आहे. ज्याप्रमाणे वर्षानुवर्षे अमेरिकेची एकतर्फी साथ देऊनही सौदीला खरी सुरक्षा मिळाली नाही, तशीच सुरक्षा या नव्या करारामुळेही मिळणार नाही.

इराणी नेते रेझाई यांनी सौदी अरेबियाला थेट इशारा देताना म्हटले की, जर सौदीने आपल्या प्रादेशिक आणि परराष्ट्र धोरणांमध्ये सुधारणा केली, तर त्यांना सुरक्षेसाठी इतरांकडे अशी भीक मागावी लागणार नाही. हा संरक्षण करार इस्लामचे सर्वात पवित्र शहर मानल्या जाणाऱ्या मक्का येथे पार पडला, ज्यानुसार तिन्ही देशांपैकी कोणावरही झालेला लष्करी हल्ला हा सर्वांवर मानला जाईल. यावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, ते या युतीच्या माध्यमातून एकत्र येऊन हिंसेच्या विरोधात लढा देणार आहेत.

पाकिस्तान, सौदी आणि तुर्की यांच्यातील जुने ऋणानुबंध आणि इस्लामिक एकजुटतेमुळेच हा संरक्षण करार अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक ठरल्याचा दावा पाकिस्तानने केला.

हा त्रिपक्षीय करार सौदी अरबचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यात झालेल्या विशेष बैठकीनंतर जाहीर करण्यात आला. वास्तविक, इराण आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या तणावाचा फटका सौदी अरेबियाला बसत आला आहे. इराण आणि त्याचे प्रादेशिक सहयोगी, विशेषतः येमेनचे हूती बंडखोर आणि इराकी मिलिशिया यांनी सौदी अरेबियाच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर आणि तेल प्रकल्पांवर वारंवार ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत.

या सततच्या हल्ल्यांमुळे त्रस्त झालेल्या सौदी अरेबियाने स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि बचावासाठी या नवीन भागीदारीचा मार्ग निवडला, मात्र यामुळे इराण (Iran) आणि सौदीमधील वाद आता अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT