US F-35 Fighter Jet Dainik Gomantak
ग्लोबल

Iran US War: इराणच्या 'स्वदेशी' शक्तीपुढे सुपरपॉवरचा थरकाप! अमेरिकेचे 850 कोटींचे F-35 फायटर जमीनदोस्त; नव्या एअर-डिफेन्स सिस्टिमने दाखवली ताकद

Iran Shoots Down US F-35 Fighter Jet: इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या युद्धाच्या 35 व्या दिवशी इराणने एक खळबळजनक दावा केला.

Manish Jadhav

Iran Shoots US Jet : इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या युद्धाच्या 35 व्या दिवशी इराणने एक खळबळजनक दावा केला. जगातील सर्वात प्रगत आणि 'अदृश्य' मानले जाणारे अमेरिकेचे F-35 स्टिल्थ फायटर जेट इराणच्या हवाई संरक्षण दलाने पाडल्याची घोषणा करण्यात आली. इराणच्या 'खातम अल-अंबिया' मुख्यालयाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिव्होल्युशनरी गार्ड कोर एअरोस्पेस फोर्सच्या नवीन स्वदेशी एअर-डिफेन्स सिस्टिमने मध्य इराणच्या आकाशात या पाचव्या पिढीतील लढाऊ विमानाचा वेध घेतला. या घटनेमुळे जागतिक संरक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून अमेरिकेच्या हवाई सामर्थ्याला हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

इराणी लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, अमेरिकेचे हे दुसरे F-35 जेट इराणच्या मध्य भागात IRGC च्या नव्या रडार आणि क्षेपणास्त्र प्रणालीने यशस्वीपणे ट्रॅक केले आणि नष्ट केले. विशेष म्हणजे, F-35 हे जगातील सर्वात प्रगत स्टिल्थ विमान मानले जाते, जे शत्रूच्या रडारला चकवा देण्यात माहीर आहे. एका विमानाची किंमत सुमारे 100 दशलक्ष डॉलर (सुमारे 850 कोटी रुपये) इतकी आहे. इराणने या हल्ल्याचा एक व्हिडिओ देखील जारी केला, ज्यामध्ये एक क्षेपणास्त्र ढगांना चिरत थेट लक्ष्याकडे झेपावताना दिसत आहे. IRGC च्या मते, त्यांची नवीन तंत्रज्ञान प्रणाली अमेरिकेच्या 'स्टिल्थ' तंत्रज्ञानाला आव्हान देण्यास पूर्णपणे सक्षम आहे.

या दाव्यामुळे अमेरिकेच्या (America) गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. अमेरिकेचे F-35 विमान आतापर्यंत 'अजेय' मानले जात होते, परंतु इराणच्या प्रगत क्षेपणास्त्र आणि रडार प्रणालीने त्याला आव्हान दिल्याने युद्धात नवीन वळण येण्याची शक्यता आहे. जरी अमेरिकन लष्कराने अद्याप या घटनेची अधिकृत पुष्टी केली नसली, तरी गेल्या काही आठवड्यांपासून अशा प्रकारच्या हल्ल्यांच्या बातम्यांमध्ये वाढ झाली. याआधीही एका F-35 विमानावर हल्ला झाला होता, ज्यानंतर त्याला आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते.

सध्याच्या परिस्थितीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी इराणला गंभीर परिणामांचा इशारा दिला. संरक्षण विश्लेषकांच्या मते, जर इराण खरोखरच F-35 सारख्या अत्याधुनिक विमानांना पाडण्यात यशस्वी होत असेल, तर या प्रादेशिक युद्धाची दिशा पूर्णपणे बदलू शकते. इराणने (Iran) स्पष्ट केले की, त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा आता अमेरिका आणि इस्रायलच्या कोणत्याही हवाई हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे. या घटनेने पश्चिम आशियातील तणाव आता एका नव्या आणि धोकादायक टप्प्यावर पोहोचला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT