Iran Airstrike In Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

Iran Airstrike: पाकिस्तानात घुसून इराणने उडवून दिले दहशतवाद्यांचे अड्डे; "याचे गंभीर परिणाम होतील," पाकचा इशारा

Iran Airstrike In Pakistan: इराणने आमच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन अस्वीकार्य आहे. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात हे इराणला कळायला हवे.

Ashutosh Masgaunde

Iran blew up terrorist hideouts by entering Pakistan; "This will have serious consequences," Pakistan warnes

इराणने पाकिस्तानात घुसून बलुच दहशतवादी संघटना जैश अल-अदलच्या तळांना लक्ष्य केले. पाकिस्ताननेही या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. (Iran Airstrike In Pakistan)

या हल्ल्यात दोन मुले मारली गेल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. त्याचवेळी तीन जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, इराणने आंतरराष्ट्रीय सीमेमध्ये सुमारे 50 किलोमीटर आत घुसून कारवाई केली. बलुचिस्तानच्या पंजगुर जिल्ह्यातील एक मशीदही त्यांनी उद्ध्वस्त केली.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, इराणने आमच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. पाकिस्तानच्या हल्ल्यात दोन निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. तर तीन मुली जखमी झाल्या आहेत. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन अस्वीकार्य आहे. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात हे इराणला कळायला हवे.

दहशतवाद हा सर्व देशांसाठी समान धोका असल्याचे पाकिस्तान नेहमीच म्हणतो. त्यासाठी एकत्रितपणे कारवाई करता येईल. एकतर्फी कारवाई हे चांगल्या शेजाऱ्याचे लक्षण नाही. ही कृती द्विपक्षीय विश्वासाला गंभीरपणे कमी करते, असे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले आहे.

इराण दहशतवादी संघटना मानत असलेल्या जैश अल-अदलची स्थापना २०१२ मध्ये झाली होती. हा एक सुन्नी दहशतवादी गट आहे जो इराणच्या दक्षिण-पूर्व प्रांत सिस्तान-बलुचिस्तानमध्ये आहे.

जैश अल-अदलने गेल्या काही वर्षांत इराणच्या सुरक्षा दलांवर अनेक हल्ले केले आहेत. डिसेंबरमध्ये, जैश अल-अदलने सिस्तान-बलुचेस्तानमधील पोलिस चौकीवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली, ज्यात 11 पोलिस ठार झाले होते.

एक दिवस आधी, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने उत्तर इराकी शहर एरबिलजवळ इस्रायलच्या मोसाद एजन्सीवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता.

सीरियात इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांवरही गार्ड्सने कारवाई केली होती. दहशतवादी गट IS च्या बैठका उद्ध्वस्त करण्यासाठी इराणने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचाही वापर केला होता. या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते.

इराणमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या बॉम्बस्फोटात 100 जणांचा मृत्यू

गेल्या आठवड्यात इराणमध्ये दोन बॉम्बस्फोट झाले होते, ज्यामध्ये 100 लोकांचा मृत्यू झाला होता. बॉम्बस्फोटामुळे इस्रायल-हमास युद्धाचा धोका वाढला आहे. तणावपूर्ण परिस्थिती पाहता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन अरब देशांना भेट देऊ शकतात. इराण आणि हमासने या हल्ल्यासाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले आहे. मात्र, अमेरिकेने हे आरोप साफ फेटाळून लावले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT