Iran Missile Attack In Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

Iran-Pakistan Tension: पाकिस्तान आणि इराणचे हल्ले नियोजित? दोन्ही देशांना एकमेकांबद्दल...-रिपोर्ट

Manish Jadhav

Iran Missile Attack In Pakistan: इराणने मंगळवारी पाकिस्तानमधील जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यानंतर ही संघटना जगभरात चर्चेत आली आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने इराणमधील आपल्या राजदूताला परत बोलावले. एवढेच नाही तर इराणचे पाकिस्तानातील राजदूत सध्या इराणमध्ये आहेत. यातच आता, इराणच्या मीडियाने दावा केला आहे की, इराणने 16 जानेवारी रोजी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराला आधीच देण्यात आली होती. एका महत्त्वाच्या इराणच्या सूत्रानुसार, तेहरानने इस्लामाबादला सांगितले नाही की, ते हे सार्वजनिक करणार आहेत. सूत्राने सांगितले की, ते स्ट्राइक करतील परंतु यास प्रचारित करु शकत नाहीत.

रिपोर्टनुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या जवळच्या मानल्या जाणार्‍या टेलिग्राम चॅनेलने 18 जानेवारी रोजी लिहिले की, "या आठवड्यात पाकिस्तानमधील दहशतवादी लक्ष्यांवर झालेल्या हल्ल्यासाठी पाकिस्तान सरकारशी समन्वय आवश्यक आहे. पाकिस्तानने आज केलेल्या या हल्ल्याने याच अनुषंगाने आकार घेतला. सीमावर्ती दहशतवादाशी लढा देण्यासाठी आणि सीमेवर कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्याच्या दोन्ही देशांच्या दृढनिश्चयाचा हा परिणाम आहे."

रिपोर्टमध्ये पुढे असेही म्हटले आहे की, काही इराणी पत्रकारांनी असे सुचवले आहे की अफगाणिस्तानमधील इराणचे दूत हसन काझेमी-कोमी यांच्या अलीकडील पाकिस्तान भेटीचा हेतू इस्लामाबादला येऊ घातलेल्या इराणी हल्ल्याबद्दल माहिती देण्याच्या उद्देशाने असू शकतो. तथापि, अशा रिपोर्टची वैयक्तिक पडताळणी करता आलेली नाही. दोन्ही देशांकडून होणारे हल्ले अलिकडच्या वर्षांतील सर्वात मोठे सीमेपलीकडील हल्ले बनले आहेत. दुसरीकडे, इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु झाल्यापासून या भागात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण झाली आहे. मात्र, इराण आणि पाकिस्तानमधील संबंधांचा इतिहास चढ-उतारांनी भरलेला आहे.

दोघांनी एकमेकांवर हल्ला केला

इराणच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्ताननेही प्रत्युत्तर दिले. इराणमधील हवाई हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्याचा दावा पाकिस्तानने गुरुवारी केला. याशिवाय, क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात 9 'दहशतवादी' मारले गेले. यापूर्वी, इराणने बलुचिस्तानमध्ये हवाई हल्ला केला. इराणच्या हवाई हल्ल्यात दोन मुले ठार तर तीन जण जखमी झाले. त्यानंतर तात्काळ पाकिस्तानने इराणच्या प्रभारी राजदूताला बोलावून 'त्याच्या हवाई क्षेत्राच्या उल्लंघना'बद्दल तीव्र निषेध नोंदवला. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने एक निवेदन जारी करुन म्हटले की, इराणचे हे कृत्य 'त्याच्या हवाई क्षेत्राचे विनाकारण केलेले उल्लंघन' आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT