Pakistans-Iran Tension: पाकिस्तानात हाय अलर्ट, बॉर्डर सील; इस्लामाबादला सतावतेय इराणची भीती

Pakistans-Iran Air Strike Latest Update: शुक्रवारी पाकिस्तानमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. येथे शेजारील देशाची राजधानी इस्लामाबादच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत.
Pakistans-Iran Tension
Pakistans-Iran TensionDainik Gomantak

Pakistans-Iran Air Strike Latest Update: इराण-पाकिस्तान यांच्यातील तू तू मैं मैं थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता, शुक्रवारी पाकिस्तानमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. येथे शेजारील देशाची राजधानी इस्लामाबादच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत आणि प्रत्येक कोपऱ्यावर पाकिस्तान पोलीस आणि लष्कर तैनात आहेत. इस्लामाबादमध्ये ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत असून संशयित लोकांना थांबवून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी, पाकिस्तानने इराणवर हवाई हल्ला केला होता, ज्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला होता.

ओळखपत्र तपासल्याशिवाय आणि दाखवल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही

ब्रीफिंगदरम्यान इस्लामाबादचे पंतप्रधान कार्यालय, पाकिस्तानी संसद आणि इतर महत्त्वाच्या कार्यालयांभोवती पोलिस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. येथे ठिकठिकाणी लष्कर तैनात आहे, जे संशयास्पद दिसणाऱ्या लोकांना थांबवून त्यांची चौकशी करत आहेत. त्याचबरोबर इस्लामाबादच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. ओळखपत्र तपासून आणि दाखवल्याशिवाय कोणालाही राजधानीत प्रवेश दिला जात नाही.

Pakistans-Iran Tension
Iran-Pakistan Tension: इराणने 'या' घटनेचा बदला घेत पाकिस्तानवर केला क्षेपणास्त्र हल्ला, मारले गेले होते 11 सैनिक

हवाई हल्ल्यात दोन्ही बाजूंनी लोकांना जीव गमवावा लागला

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी सकाळपासून कराची, इस्लामाबाद, लाहोर, फैसलाबादसह पाकिस्तानातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पाकिस्तानने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. याआधी इराणनेही पाकिस्तानवर हवाई हल्ला केला. दोन्ही देशांनी एकमेकांवर आपापल्या देशात दहशतवादी संघटनांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, दोघांनीही एकमेकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. हवाई हल्ल्यात आतापर्यंत दीड डझन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Pakistans-Iran Tension
Iran-America Tension: इराणच्या 'सर्वात शक्तिशाली ठिकाणी' मोठा स्फोट, अमेरिकेसोबतचा वाढू शकतो तणाव

पाकिस्ताननेही हवाई हल्ला केला

मिळालेल्या माहितीनुसार, इराणने यापूर्वी पाकिस्तानमधील जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांना लक्ष्य केले होते. ही सुन्नी दहशतवादी संघटना आहे. इराणमध्ये अनेक दहशतवादी घटना घडवून इराणमधील सर्वसामान्यांचे रक्त सांडणाऱ्या या गटाला पाकिस्तानी लष्कर मदत करते, असा इराणचा आरोप होता. त्याचवेळी, पाकिस्तानने इराणमधील बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) आणि बलुचिस्तान लिबरेशन फोर्स (BLF) च्या एकापेक्षा जास्त तळांवर हवाई हल्ले केले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या देशाच्या सुरक्षेशी तडजोड करणार नसल्याचे सांगितले होते. बीएलएफ आणि बीएलए सारख्या संघटनांच्या दहशतवादी कारवाया तेथे फोफावत असल्याबद्दल त्यांनी अनेकदा इराणला अहवाल पाठवला, परंतु त्यांनी त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com