Gail Omvet Dainik Gomantak
ग्लोबल

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लेखिका, संशोधक डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन

क्रांतिकारी बाबूजी पाटणकर (Krantikari Babuji Patankar) संस्थेच्या आवारामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेले समाज शास्त्रज्ञा, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या आणि धोरण समितीच्या सदस्या, तसेच स्त्री-मुक्ती विचारांसह संत साहित्याची आणि वारकरी तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण मांडणी करणाऱ्या ख्यातनाम जेष्ठ संशोधक-लेखिका गेल ऑम्व्हेट (Gail Omvet) यांचे आज निधन झाले. त्या 81 वर्षाच्या होत्या. ऑम्व्हेट यांच्यावर गुरुवारी 26 रोजी सकाळी दहा वाजता कासेगाव (Kasegaon) येथील क्रांतिकारी बाबूजी पाटणकर (Krantikari Babuji Patankar) संस्थेच्या आवारामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. डॉ. गेल यांना चालता येत नसल्यामुळे कासेगाव येथे वैद्यकिय उपचार घेत होत्या.

दरम्यान, डॉ. गेल या मूळच्या अमेरिकेच्या आहेत. त्या विद्यार्थीदशेपासून वेगवेगळ्या विद्यार्थी चळवळीमध्ये सक्रिय होत्या. साम्राज्यावादाविरोधात अमेरिकेमध्ये सुरु झालेल्या चळवळीत त्या अग्रस्थानी होत्या. डॉ. गेल यांनी अमेरिकेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्या भारतामध्ये आल्या, आणि देशातील वेगवेगळ्या सामाजिक चळवळींचा अभ्यास करत असताना त्या महाराष्ट्रामध्ये आल्या. डॉ. गेल यांच्यावर महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी ब्रिटीश काळात महात्मा फुले यांनी केलेल्या संघर्षांचा अभ्यासही केला.

त्यानंतर गेल यांनी आपल्या पिएचडीचा विषयही महात्मा फुले यांचं वासाहतिक समाजातील बंड यावर आधारित होता. हा प्रबंध अमेरिकेमधील युनिव्हरसिटी ऑफ कॅलिफोर्निया बरकली विद्यापीठात सादर करुन त्यांनी डॉक्टरेटची पदवी संपादन केली. त्यांच्या संशोधनापूर्वी महात्मा जोतिबा फुलेंच्या सामाजिक चळवळीवर एवढा विस्तृत अभ्यास इतर कोणीही केला नव्हता. त्यांचा हा पीएचडीसाठी सादर केलेला प्रबंध भारताबरोबर जगभरातील अभ्यासंकासाठी मैलाचा दगड ठरला. गेल यांच्य या पुस्तकांमुळे महात्मा फुलेंची चळवळ पुन्हा एकदा नव्याने जिवंत झाली. त्यांच्या या पुस्तकामुळे आदर्श घेत बहुजन समाज पक्षाचे (Bahujan Samaj Party) संस्थापक दिवंगत काशीराम कासेगावमध्ये त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी येत असत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT