Malala Yousafzai Dainik Gomantak
ग्लोबल

International Malala Day: मुलींच्या शिक्षणासाठी लढणाऱ्या मलालावर झाला होता तालिबानी हल्ला

2012 मध्ये मुलींच्या शिक्षणासाठी मोहिम राबवणाऱ्या मलालाच्या डोक्यात तालिबानने गोळी घातली होती.

दैनिक गोमन्तक

International Malala Day: दरवर्षी 12 जुलै हा आंतरराष्ट्रीय मलाला दिवस म्हणून साजरा केला जातो. 12 जुलैला पाकिस्तानी समाजसेविका, नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईचा वाढदिवस आहे. हा दिवस संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक मलाला दिवस म्हणून घोषित केला आहे. मलाला दिन महिला आणि मुलांच्या हक्कांच्या सन्मानार्थ जगभरात साजरा केला जातो.

मलालाचा जन्म 12 जुलै 1997 रोजी पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यात झाला. मलालाला कधीही शाळेत जाण्याची परवानगी नव्हती, कारण तालिबानने पाकिस्तानमध्ये मुलींना शाळेत जाण्यास बंदी घातली होती. मात्र, मलालाने घरी राहण्यास नकार देत मुलींच्या शिक्षणाच्या अधिकाराची वकिली केली.

मलालावर तालिबानी हल्ला

2012 मध्ये मुलींच्या शिक्षणाच्या मोहिमेमुळे मलालाला तालिबानने डोक्यात गोळी मारली होती. “ऑक्टोबर 2012 मध्ये पाकिस्तानी तालिबानचा एक सदस्य माझ्या स्कूल बसमध्ये चढला आणि मला गोळ्या घातल्या. गोळी लागल्याने माझा डावा डोळा आणि मेंदूवर वाईट परिणाम झाला. माझ्या चेहऱ्यातील नसा, माझा कानाचा पडदा आणि जबडा तुटला होता. मी कशी वाचले ते मला माहित नाही." असे मलालाने सांगतिले होते.

समाजसेविका मलाला

या हल्ल्याने मलालाचे आयुष्य पुर्णपणे बदलून टाकले. जेव्हा ती बरी झाल्यानंतर परत आली तेव्हा तिच्या विचारांमध्ये तीव्रता दिसून आली. मलालाने महिला आणि मुलींच्या शिक्षणासाठी आवाज उठवला. 2013 मध्ये मलालाने संयुक्त राष्ट्र महासभेच्या विशेष सत्राला संबोधित केले होते. संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस पाकिस्तानची बाल आणि महिला हक्क कार्यकर्त्या आंतरराष्ट्रीय मलाला दिवस म्हणून घोषित केला आहे. मलाला आणि तिच्या वडिलांनी 'मलाला फंड' स्थापन केला आहे, जो तरुण मुलींना शाळेत जाण्यास मदत करतो.

मलाला युसुफझाईला 2012 मध्ये पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय युवा शांतता पुरस्काराने सन्मानित केले होते. डिसेंबर 2014 मध्ये मलालाला शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. मलाला ही नोबेल शांतता पारितोषिक मिळवणारी सर्वात तरुण महिला ठरली. 2017 मध्ये, मलालाला UN शांतता दूत म्हणून नियुक्त करण्यात आले. मलालाला तिच्या कामासाठी आणि धैर्यासाठी 40 हून अधिक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT