''अफगाणिस्तानात महिलांना कामापासून दूर ठेवणं म्हणजे...'': मलाला यूसुफजई

अफगाणिस्तानातील महिलांसाठी हिजाब अनिवार्य करण्याच्या तालिबानच्या आदेशावर नोबेल पारितोषिक विजेती मलाला यूसुफजईने (Malala Yousafzai) नाराजी व्यक्त केली आहे.
Malala Yousafzai
Malala YousafzaiDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानातील महिलांसाठी हिजाब अनिवार्य करण्याच्या तालिबानच्या आदेशावर नोबेल पारितोषिक विजेती मलाला यूसुफजईने नाराजी व्यक्त केली आहे. यावर मलालाने अफगाणिस्तानातील महिला आणि मुलींच्या स्वातंत्र्याची भीती व्यक्त केली. मलाला म्हणाली, "तालिबानला सार्वजनिक जीवनातून मुली आणि महिलांना संपवायचे आहे. मुलींना शाळेपासून आणि महिलांना कामापासून दूर ठेवायचे आहे. त्यांना कुटुंबातील पुरुष सदस्याशिवाय प्रवास करण्यापासून वंचित ठेवायचे आहे." (Malala Yousafzai has expressed displeasure over the Taliban's order to make hijab compulsory for women)

Malala Yousafzai
अफगाणिस्तान पुन्हा हादरले, मशिदीत बॉम्बस्फोट

दरम्यान, लाखो महिला आणि मुलींच्या मानवी हक्क उल्लंघनासाठी तालिबानला (Taliban) जबाबदार धरण्यासाठी मलालाने जागतिक नेत्यांना सामूहिक अ‍ॅक्शन घेण्याचे आवाहन केले. "आपण अफगाण महिलांबद्दलची संवेदनशीलता गमावू नये, कारण तालिबान आपल्या आश्वासनांवर कायम राहताना दिसत नाहीयं. महिला अजूनही त्यांच्या मानवी हक्कांसाठी (Human rights) रस्त्यावर उतरत आहेत. आपण सर्वांनी आणि विशेषतः मुस्लिम देशांनी त्यांच्यासमोर उभे राहिले पाहिजे."

नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा

खरं तर, तालिबान सरकारने अलीकडेच नागरिकांसाठी, विशेषतः महिलांसाठी काही नियम ठरवले आहेत. या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असून तसे न केल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे. देशात शरिया कायदा लागू करण्याचा पुरस्कार करणाऱ्या तालिबानने महिलांसाठी इतके कठोर नियम घालून दिले आहेत की, जगभरातून त्याचा निषेध होत आहे. अफगाणिस्तानच्या (Afghanistan) कट्टरपंथी सरकारवर भूतकाळात स्त्रियांचे भाषण स्वातंत्र्य आणि शिक्षण स्वातंत्र्य यासारख्या अधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com