Monika Kabir Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: रील बनवणाऱ्या मॉडेलचा तमाशा! भररस्त्यात एकाला झोडपलं, सोशल मीडियावर उठली टीकेची झोड; काय घडलं नेमकं?

Monika Kabir Reel Controversy: बांगलादेशातील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून त्यात इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल मोनिका कबीर एका व्यक्तीला भररस्त्यात मारहाण करताना दिसत आहे.

Manish Jadhav

Monika Kabir Reel Controversy: मॉडेलिंग आणि ग्लॅमरचे जग नेहमीच झगमगाटाने भरलेले असते, पण जेव्हा या क्षेत्रातील एखादी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी आपले नियंत्रण गमावते, तेव्हा ती एक मोठी बातमी ठरते. सध्या सोशल मीडियावर बांगलादेशातील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून त्यात इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल मोनिका कबीर एका व्यक्तीला भररस्त्यात मारहाण करताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर इंटरनेटवर दोन गट पडले असून मॉडेलच्या वागणुकीवर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

काय घडलं नेमकं?

मोनिका कबीर ही रस्त्यावर कॅमेऱ्यासमोर आपली एक 'रील' शूट करण्यासाठी पोज देत उभी होती. यावेळी तिथून चालत जाणारा एक माणूस तिच्या अगदी जवळून गेला. या एका किरकोळ कारणावरुन मोनिकाचा पारा चढला आणि तिने विचार न करता त्याच्यावर हल्ला केला. तिने त्याला मारहाण करायला सुरुवात केली, जे पाहून तिथे उपस्थित असलेले लोकही थक्क झाले. रील बनवताना व्यत्यय आल्याने किंवा त्या व्यक्तीने मुद्दाम जवळून जाण्याचा प्रयत्न केला, या संशयावरुन तिने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसते. मात्र, एका व्यक्तीला अशा प्रकारे मारहाण अनेकांना रुचलेले नाही.

सोशल मीडियावर (Social Media) या प्रकरणावरुन कमेंट्सचा पाऊस पडत आहे. एका बाजूला काही युझर्स मोनिकाच्या या 'धाडसाचे' कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे बहुसंख्य लोकांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली. 'सिल्व्हिया ब्रेथ्स' नावाच्या एका इंस्टाग्राम युझरने लिहिले की, "मला वाटते ती पूर्णपणे चुकीची आहे! केवळ शौर्य दाखवण्याच्या नादात ती एखाद्या जोकरसारखी वागली."

दुसऱ्या एका युझरने संताप व्यक्त करताना म्हटले की, "तो माणूस तुम्हाला पाहतही नव्हता. त्याने फक्त एका क्षणासाठी तुमच्याकडे पाहिले आणि तो आपल्या कामाला निघून गेला होता. तुम्ही केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी त्याला शारीरिक त्रास देत आहात. तुम्ही बांगलादेशात केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आला आहात, बाकी काही नाही." काही युझर्संनी तर तिला 'लॅडी व्हिलन' म्हणत हिणवले आहे आणि महिला असल्याचा गैरफायदा घेऊ नका, असा सल्लाही दिला.

मात्र, या वादात मुरादू नावाच्या एका युझरने मोनिकाची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. त्याने म्हटले की, "मी तो व्हिडिओ पाच पेक्षा जास्त वेळा पाहिला. त्या माणसाच्या दोन्ही बाजूला खूप जागा होती, तरीही तो थेट तिच्या शेजारुन चालत गेला. त्याचे खांदे तिला स्पर्श झाले आणि त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव संशयास्पद होते. त्याने हे जाणूनबुजून केले असावे. जरी मोनिकाला मानसिक आरोग्याच्या समस्या असतील किंवा ती मेट्रोमध्ये माकडासारखी लटकत प्रसिद्धी मिळवत असली, तरी या विशिष्ट प्रकरणात मी तिच्या पाठीशी उभा राहीन."

थोडक्यात सांगायचे तर, रील संस्कृती आणि सोशल मीडिया व्ह्यूजच्या नादात मानवी संवेदना हरवत चालल्या आहेत का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. प्रसिद्धीसाठी किंवा किरकोळ धक्क्यासाठी कोणाही ज्येष्ठ नागरिकाचा अपमान करणे किंवा त्यांना मारहाण करणे हे सभ्य समाजात समर्थनीय ठरु शकत नाही. आता या प्रकरणात बांगलादेशातील संबंधित यंत्रणा काही कारवाई करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT