Indonesia Passenger Ship Dainik Gomantak
ग्लोबल

Indonesia Passenger Ship: इंडोनेशियात 240 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता; वादळी हवामानामुळे संपर्क तुटल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

Indonesia Missing Passenger Ship: इंडोनेशियाच्या सागरी हद्दीतून एक अत्यंत चिंताजनक आणि मोठी बातमी समोर येत आहे. बोर्नियो बेटाजवळ 240 प्रवाशांना घेऊन जाणारे एक मोठे प्रवासी जहाज अचानक बेपत्ता झाले.

Manish Jadhav

Indonesia Missing Passenger Ship: इंडोनेशियाच्या सागरी हद्दीतून एक अत्यंत चिंताजनक आणि मोठी बातमी समोर येत आहे. बोर्नियो बेटाजवळ 240 प्रवाशांना घेऊन जाणारे एक मोठे प्रवासी जहाज अचानक बेपत्ता झाले. हे जहाज पूर्व जावा प्रांतातील सुराबाया या इंडोनेशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहरातून दक्षिण कालीमंतन प्रांताची राजधानी बंजारमासिनकडे जात असताना जावा समुद्रात त्याचा अचानक संपर्क तुटला. जहाजाचा संपर्क तुटल्याचे समजताच इंडोनेशियाच्या बचाव पथकाने तातडीने जावा समुद्रात व्यापक शोध आणि बचाव मोहीम सुरु केली.

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, 'वर्को ट्रान्सपोर्ट 8' असे या बेपत्ता झालेल्या जहाजाचे नाव आहे. जहाजाचे ऑपरेटर 'पीटी व्हर्गो योएल रिही' यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जहाजाने शनिवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:13 वाजता सुराबाया बंदरातून बंजारमासिनसाठी प्रवास सुरु केला होता. मात्र, प्रवासादरम्यान जावा समुद्रात पोहोचल्यानंतर जहाजाची दळणवळण यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली आणि जहाजाशी असणारा संपर्क तुटला.

बंजारमासिन येथील सर्च अँड रेस्क्यू ऑफिसचे प्रमुख आय पुतू सुदायाना यांनी व्हिडिओ ब्रीफिंगमध्ये स्पष्ट केले की, जहाजाला प्रवासादरम्यान अचानक अत्यंत वाईट आणि वादळी हवामानाचा सामना करावा लागला. या खराब हवामानाची माहिती जहाजाच्या ऑपरेटरने तातडीने प्रशासनाला दिली, त्यानंतर काही वेळातच जहाजाचा संपर्क तुटला.

प्रारंभिक तपासात जहाजाचे शेवटचे लोकेशन जावा समुद्रात नोंदवले गेले असून, ते स्थान बंजारमासिन शहराच्या घाटापासून सुमारे 148 किलोमीटर अंतरावर आहे. जहाजाचा संपर्क तुटल्याचे स्पष्ट होताच बंजारमासिन येथील बसिरिह सर्च अँड रेस्क्यू पियरवरुन एका विशेष बचाव पथकाला तात्काळ पाचारण करण्यात आले. तसेच एक अत्याधुनिक बचाव जहाज 'वर्को ट्रान्सपोर्ट 8'च्या शेवटच्या संभाव्य लोकेशनच्या दिशेने रवाना करण्यात आले.

सुदैवाने, या दुर्घटनेत अद्याप कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, 240 प्रवाशांचा जीव धोक्यात असल्याने संपूर्ण इंडोनेशियात चिंतेचे वातावरण पसरले आहे. बचाव पथके सध्या अत्यंत प्रतिकूल हवामानात समुद्राच्या लाटांशी सामना करत जहाजाचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

Goa Weather Update: काणकोणमध्ये वादळी पावसाचा तडाखा! चावडीत झाड कोसळून वाहतूक कोंडी; शेळेरमध्ये घराचे अडीच लाखांचे नुकसान

Goa Agriculture: डिचोलीत परतीच्या पावसाचा भातशेतीला फटका! मयेतील भातपीक आडवे, बळीराजा चिंतेत

SCROLL FOR NEXT