भारत आणि चीनने गोगरा भागातून आपले सैन्य मागे (India and China withdraw their troops from Gogra area) घेतले आहे.  Dainik Gomantak
ग्लोबल

Indo-China: 15 महिन्यांच्या तणावानंतर अखेर गोगरा भागातील वाद संपण्याच्या मार्गावर

सैन्य मागे घेण्याबरोबरच, दोन्ही देश LAC च्या भागातील समस्या दूर करण्यासाठी पुढील चर्चा सुरू ठेवणार आहेत. याबाबत दोन्ही देशांकडून सहमती दर्शविण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: लडाखमधील पूर्व भागात (In the eastern part of Ladakh) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) लष्करी संघर्ष संपवण्याच्या दिशेने मोठे पाऊल (A big step towards ending the military conflict) टाकत भारत आणि चीनने गोगरा भागातून आपले सैन्य मागे (India and China withdraw their troops from Gogra area) घेतले आहे. दोन्ही देशांनी या आघाडीवर बांधलेली सर्व तात्पुरती बांधकामे आणि पायाभूत सुविधाही उध्वस्त केल्या आहेत. गोगरा येथील एलएसीच्या पेट्रोलिंग पॉईंट 17 ए वरून सैन्य मागे घेण्यासाठी, गेल्या 15 महिन्यांपासून दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये येथील सीमेवर संघर्ष सुरु होता.

अनेक मुद्द्यांवर वाटाघाटी सुरू

सैन्य मागे घेण्याबरोबरच, दोन्ही देश LAC च्या भागातील समस्या दूर करण्यासाठी पुढील चर्चा सुरू ठेवणार आहेत. याबाबत दोन्ही देशांकडून सहमती दर्शविण्यात आली आहे. दोन्ही देशांनी आता एलएसीवरील शांततेची परिस्थिती बदलू न देण्याचेही मान्य केले आहे. भारतीय लष्कराकडून जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 31 जुलै रोजी चुशुल-मोल्दो पोस्टवर झालेल्या चर्चेच्या 12 व्या फेरीत भारत-चीनच्या लष्करी कमांडरांनी मान्य केल्याप्रमाणे दोन दिवसांत गोगरा भागातून आपले सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. दोन्ही देशांनी 4 आणि 5 ऑगस्ट रोजी पेट्रोलिंग पॉईंट 17 ए वरून आपले सैन्य मागे घेतले.

दोन्ही देशांमध्ये सैन्य मागे घेण्याचा झाला करार

भारतीय लष्कराने पूर्व लडाखमधील दोन्ही देशांमध्ये असणारा तणाव संपविण्याच्या दिशेने पावले टाकली असून, या मोठ्या प्रगतीबद्दल माहिती शेअर करताना म्हटले आहे की, पश्चिम क्षेत्रातील उर्वरित भागांतील संघर्ष संपवण्यासाठी लष्करी कमांडर्समध्ये तीव्र आणि खुल्या चर्चा झाली त्यानंतर सैन्य मागे घेण्यात येणार होते, तसा एक करार झाला देखील यावेळी झाला होता. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, या करारानुसार भारत आणि चीनने टप्प्याटप्प्याने आणि समन्वयाने गोगरा येथे तैनात असलेले आपले सैन्य मागे घेतले आहे.

सैनिक मागे घेतल्याची केली पडताळणी

दोन्ही देशांनी एकमेकांचे सैनिक या भागातून मागे घेतल्यानंतर या प्रक्रियेची दोघांकडूनही पडताळणी करण्यात आली आहे. लष्कराचे म्हणणे आहे की, दोन्ही देशांत निर्माण झालेला तणाव सोडवण्यासाठी या कराराचे दोन्ही देशांकडून LAC भागांत काटेकोरपणे पालन आणि आदर करणे आवश्यक आहे.

दुसऱ्या आघाडीवर संघर्ष संपतो

गोगरामधून दोन्ही देशांनी सैन्य मागे घेतल्याने चीन आणि भारतात गोगरा भागातील असणारा तणाव दूर झाला आहे. याआधी, पूर्व लडाखमधील एलएसीवरील तणाव दूर करण्यात दोन्ही देशांना यश आले होते.

गोगरात गेल्या वर्षापासून भारत आणि चीन सैन्य आमने-सामने

गोगरा परिसरात गेल्या वर्षी मे महिन्यापासून दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर उभे ठाकले होते. तरी देखील गलवान आणि पॅंगॉन्गच्या तलाव भागात तैनात करण्याच्या आलेल्या सैनिकांपेक्षा गोगरामध्ये सैन्य आणि शस्त्रांची संख्या कमी होती.

याआधी गलवान आणि पॅनगॉन्ग सरोवरातून काढण्यात आले

गोगराच्या आधी दोन्ही देशांनी पॅनगॉन्ग तलावच्या भागात आणि गलवानच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यांवरून आपले सैन्य मागे घेऊन तेथे दोन्ही देशांकडून बफर झोन तयार करण्यात आला होता. यावर्षी फेब्रुवारीमध्ये पॅनगॉन्ग तलाव परिसरातील सैन्य माघारीनंतर दोन्ही देशांत चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर आता गोगरा भागातून देखील सैन्य हटवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT