लद्दाख संघर्षानंतर भारत चीन चर्चेसाठी पुन्हा एकत्र

भारतीय लष्कराच्या सूत्रानुसार, कोर कमांडर स्तराचे हे संभाषण शनिवारी सकाळी 10.30 च्या सुमारास प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या चिनी(India-China) बाजू मोल्दो येथे होणार असून
Will the conflict in Ladakh be reduced India and China together for talks
Will the conflict in Ladakh be reduced India and China together for talksDainik Gomantak

भारत आणि चीन(India-China) यांच्यात पूर्व लडाखमधील(Ladakh) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर(LAC) गेल्या वर्षी एप्रिलपासून तणाव सुरूच आहे. दोन्ही देश हा तणाव कमी करण्यासाठी सातत्याने चर्चा करीत आहेत.जरी पॅनगॉन्ग तलावाच्या काठासह अनेक ठिकाणांचे विषय मार्गी लागले असले तरी अजूनही काही मुद्दे शिल्लक आहेत जेथे दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आहेत. हे पाहता उद्या शनिवारी भारत आणि चीन यांच्यात कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेची 12 वी फेरी उद्या होणार आहे.(Will the conflict in Ladakh be reduced India and China together for talks)

भारतीय लष्कराच्या सूत्रानुसार, कोर कमांडर स्तराचे हे संभाषण शनिवारी सकाळी 10.30 च्या सुमारास प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या चिनी बाजू मोल्दो येथे होणार असून .अशी अपेक्षा आहे की या संभाषणात दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी हॉट स्प्रिंग्स आणि गोगरा हाइट्स भागातील संभंदावर चर्चा करणारा आहेत.

Will the conflict in Ladakh be reduced India and China together for talks
बलात्काराच्या आरोपीशी तरुणीन केलं लग्न मात्र...

या आधी , चीनने LAC विवाद संपवण्यासाठी 26 जुलै रोजी चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती मात्र भारताने ते कारगिल विजय दिवसामुळे नाकारले होते. भारताने चीनला नवीन तारीख निश्चित करण्यास सांगितले होते आणि त्यानुसार आता शनिवारी सकाळी ही 12 वी फेरीची चर्चा होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत एकूण 11 वेळेस चर्चा झाल्या आहेत आणि या चर्चेमुळेच दोन्ही सैन्याने अनेक ठिकाणी माघार घेतली आहे असून तरीही डेपसंग मैदाने, गोगरा आणि हॉट स्प्रिंग्समध्ये तणाव कायमच आहे.

त्याचवेळी भारताने हे स्पष्ट केले आहे की एकाच वेळी माघार घेण्याबाबत जर करार झाला तरच तो पूर्णपणे पाळण्यास तयार आहे.या मुद्द्यावर, परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या महिन्यात असेही म्हटले होते की, दोन्ही बाजूंनी एलएसीसह सर्व वादग्रस्त भागातून पूर्णपणे माघार घेण्यासाठी चर्चेची पुढील फेरी घेण्यास आम्ही सहमती दर्शविली आहे.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पूर्व लडाखमधील एलएसीवर दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आले होते. यानंतर चीनच्या कारवायांमुळे बर्‍याच वेळा परिस्थिती खूप तणावग्रस्त झाली होती. मागील वर्षाच्या मध्यभागी गलवान खोरीत दोन्ही देशांमध्ये हिंसक झुंज झाली होती यात भारताचे 20 सैनिक शहीद झाले आणि चीनचे बरेच सैनिकही मारले गेले. तथापि, चीनने संघर्षात ठार झालेल्या सैनिकांची वास्तविक संख्या सांगितली नव्हती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com