Philadelphia Shoot Dainik Gomantak
ग्लोबल

US च्या फिलाडेल्फियामध्ये जमावावर अंदाधुंद गोळीबार; 3 ठार

अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे शनिवारी रात्री उशिरा एका बंदूकधाऱ्याने जमावावर अंदाधुंद गोळीबार केला.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेतील (America) फिलाडेल्फिया (Philadelphia) येथे शनिवारी रात्री उशिरा एका बंदूकधाऱ्याने जमावावर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत आतापर्यंत किमान 3 जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. तर त्या गोळीबारामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. (Indiscriminate firing on crowds in Philadelphia America 3 killed)

अमेरिकन न्यूज चॅनलने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यरात्रीनंतर घडली आहे. यात अनेक बंदूकधारी सामील असल्याचे बोलले जाते आहे. प्राथमिक अहवालानुसार मृतांचा आकडा वाढू शकतो तसेच आतापर्यंत किमान 14 जण जखमी झाले आहेत.

संशयिताची हत्या झाली आहे की नाही हे सध्यातरी स्पष्ट झालेले नाही. अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की कोणालाही अटक करण्यात आलेली नाही परंतु एक शस्त्र जप्त केले गेले आहे. सध्या संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, रविवारी पहाटे बंदुकधारींचा शोध घेत आहेत. शूटरपैकी एक अमेरिकन स्ट्रीटवर दक्षिणेकडे धावताना दिसला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी दोन बंदुका सापडल्या असून त्यातील एकामध्ये एक मॅगझिन देखील होती. अधिकाऱ्यांनी साउथ स्ट्रीटवरील दुसऱ्या आणि पाचव्या रस्त्यांदरम्यानचा भाग रात्रभर बंद केला होता.

मृतांचा आकडा वाढू शकतो,

पोलिसांनी सांगितलेल्या माहिती मध्ये 25 वर्षीय महिला आणि 22 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 7 जखमींना थॉमस जेफरसन रुग्णालयात दाखल केले आहे. संशयितासह इतर पाच जणांना पेनसिल्व्हेनिया रुग्णालयात नेण्यात आले आहे.

इतर तीन पीडितांना पेन प्रेस्बिटेरियन मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत . 25 मे रोजी टेक्सासमधील एका शाळेत झालेल्या गोळीबारात 19 विद्यार्थ्यांसह 23 जणांचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ते आमचं बाळ...! कुत्र्याला सोबत नेण्यासाठी हैदराबादच्या जोडप्याने मोजले तब्बल '15 लाख'; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

दक्षिण आफ्रिकेत मृत्यूचं तांडव! ट्रक आणि मिनीबस यांच्यात भीषण अपघात; चुकीच्या यू-टर्नने घेतला शाळकरी मुलासह 11 जणांचा बळी

Sattari Fire: सालेली, सत्तरी येथे काजू बागायतीला आग

...तर गोमंतकीयांना 10 लाखांचा आरोग्य विमा; 2027ला सत्तेत आल्यास 'मुख्यमंत्री सेहत' योजने'ची तत्काळ अंमलबजावणी, आतिषी यांची घोषणा

Goa Social Media Ban: मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची तयारी; गोवा सरकारची घोषणा मोठी, पण अंमलबजावणी सोपी नाही

SCROLL FOR NEXT