Daniel Barenboim (L) And Palestinian peace activist Ali Abu Awwad Dainik Gomantak
ग्लोबल

Indira Gandhi Peace Prize 2023: 'या' दिग्गजांना मिळाला यंदाचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार; शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी...

Indira Gandhi Peace Prize 2023: 2023 वर्षासाठीचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. संगीतकार डॅनियल बरेनबोइम आणि शांतता कार्यकर्ते अली अबू अव्वाद यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

Manish Jadhav

Indira Gandhi Peace Prize 2023: इस्रायल आणि हमास यांच्यात सध्या घनघोर युद्ध सुरु आहे. यादरम्यानच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. 2023 वर्षासाठीचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. संगीतकार डॅनियल बरेनबोइम आणि शांतता कार्यकर्ते अली अबू अव्वाद यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दोघांनाही शांतता आणि विकासासाठी 2023 वर्षासाठीचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार संयुक्तपणे प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठीची नावे आंतरराष्ट्रीय ज्युरीने जाहीर केली. या ज्युरीचे अध्यक्ष देशाचे माजी सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर होते.

दरम्यान, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. यावेळी हा पुरस्कार दोन सेलिब्रिटींना संयुक्तपणे देण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांनाही हा पुरस्कार देण्यात येत आहे कारण त्यांनी इस्रायल-हमास युद्धादरम्यान शांतता आणि सौहार्द राखण्यात त्यांची संगीत कला आणि शांततापूर्ण संवादामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. सामाजिक आणि सांस्कृतिक समज वाढवण्यासाठी त्यांनी काम केले. दोघांचाही सन्मान करण्याची घोषणा युद्धाच्या मध्यंतरी करण्यात आली.

डॅनियल बेरेनबोइम कोण आहेत?

डॅनियल यांचा जन्म अर्जेंटिना इथे झाला. ते एक प्रसिद्ध पियानोवादक आहेत. त्यांचा बँड आणि संगीत जगभर प्रसिद्ध आहे. त्यांनी आपल्या संगीताद्वारे पश्चिम आशियात शांतता आणि सौहार्द वाढवण्याचा प्रयत्न केला. ते 1992 ते जानेवारी 2023 पर्यंत बर्लिन स्टेट ऑपेराचे संगीत दिग्दर्शक होते. त्यांनी अनेक पुरस्कार पटकावले आहेत. त्यांना जर्मनीचा ग्रेट क्रॉस ऑफ मेरिट आणि स्पेनचा प्रिन्स ऑफ अस्टुरियस पुरस्कार मिळाला आहे. त्यांना फ्रान्सचा कमांडर ऑफ द लीजन ऑफ ऑनरही मिळाला.

कोण आहेत अली अबू अव्वाद?

अली अबू अव्वाद हे 1972 मध्ये जन्मलेले पॅलेस्टिनी शांतता कार्यकर्ता आहेत. इस्रायल-हमास युद्धादरम्यान शांततेच्या प्रयत्नांसाठी ते पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील लोकांसोबत एकत्र काम करत आहेत. निर्वासित कुटुंबात जन्मलेल्या आणि वाढलेल्या, अव्वाद यांना युद्धात विस्थापित झालेल्या लोकांच्या वेदना समजतात. ते 3 वर्षांपासून तुरुंगात आहेत. त्यांनी आपल्या आईला भेटण्यासाठी 17 दिवस उपोषणही केले होते, त्यामुळे तिला त्यांना भेटण्याची परवानगी मिळाली होती. अबू गांधीजींच्या तत्त्वांचे आणि अहिंसेच्या मार्गाचे पालन करतात. अहिंसेचा मार्ग अवलंबूनच स्वातंत्र्य मिळू शकते, असे त्यांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Goa Flight: विमानात तांत्रिक बिघाड; दिल्लीतून गोव्याला येत असलेले विमान मुंबईला वळवले

पावसाळी अधिवेशनापूर्वी आमदार विजय सरदेसाई अडचणीत; सभापती तवडकरांबाबत जातीय वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिस तक्रार

Israel Syria Attack: दमास्कसमधील 'ड्रोन हल्ला' लाइव्ह! स्फोट होताच टीव्ही अँकरची उडाली भंबेरी, व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: सोनं-चांदी झालं स्वस्त! सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या दर

POP Ganesh Idol: गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर कठोर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

SCROLL FOR NEXT