America Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकेचा गोल्डन व्हिसा मिळवण्यात भारतीय 'अव्वल', कोणाला मिळतो व्हिसा आणि त्याचे फायदे काय?

Indian Tops On in America’s Golden: अमेरिकेचा गोल्डन व्हिसा मिळवण्यात भारतीय आघाडीवर आहेत.

Manish Jadhav

Indian Tops On in America’s Golden: अमेरिकेचा गोल्डन व्हिसा मिळवण्यात भारतीय आघाडीवर आहेत. एका अहवालानुसार, गेल्या एका वर्षात गोल्डन व्हिसा मिळवण्याच्या संख्येत 57 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

याचा फायदा केवळ भारतीय लोकांनाच होणार नाही तर अमेरिकेलाही फायदा होईल. या मॉडेलचा अमेरिकन अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होत आहे. 2016 मध्ये सुरु झालेली ही योजना 2019 आणि 2020 मध्ये बंद करण्यात आली होती.

2022 मध्ये 1381 भारतीयांना गोल्डन व्हिसा मिळाला

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचा (America) गोल्डन व्हिसा (EB-5) भारतीय लोकांना सर्वाधिक मिळाला आहे. 2021 मध्ये 876 भारतीयांना गोल्डन व्हिसा मिळाला आहे. तर 2022 मध्ये 1381 भारतीयांना गोल्डन व्हिसा देण्यात आला होता.

यासोबतच 2023 मध्ये सुमारे 1600 भारतीयांना गोल्डन व्हिसा मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेचा गोल्डन व्हिसा मिळवण्यासाठी अमेरिकेत किमान 6.5 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

संपूर्ण कुटुंबाला स्थायिक होण्याची परवानगी मिळते

यूएस इमिग्रेशन फंडचे निकोलस हॅन्स यांनी सांगितले की, ग्रीन कार्ड्सची अतिश्रीमंत भारतीय वाट पाहतात. गोल्डन व्हिसासाठी स्पॉन्सर किंवा प्रोफेशनल डिग्री आवश्यक नाही. गोल्डन व्हिसाचेही अनेक फायदे आहेत. यानंतर, अमेरिकन नागरिकत्व मिळणे खूप सोपे होते.

तसेच, अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाला अमेरिकेत स्थायिक होण्याची परवानगी मिळते. तुम्हाला पहिल्या दोन वर्षांसाठी कायमस्वरुपी निवासाचा अधिकार मिळतो. त्यानंतर पाच वर्षांनी नागरिकत्व मिळते.

अमेरिकन अर्थव्यवस्थेला खूप फायदा होत आहे

गोल्डन व्हिसा प्राप्तकर्त्याकडून किमान 6.5 कोटी रुपये मिळाल्यानंतर, यूएस 20 अर्जदारांचा एक पूल तयार करते. अमेरिकन सरकार रिअल इस्टेटमध्ये त्याची गुंतवणूक करते. त्या बदल्यात अमेरिकन सरकारला नियमितपणे व्याज मिळत राहते.

यासोबतच रोजगाराच्या संधीही वाढतात. या मॉडेलचा अमेरिकन अर्थव्यवस्थेला (Economy) मोठा फायदा होत आहे. 2016 मध्ये सुरु झालेली ही योजना 2019 आणि 2020 मध्ये बंद करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: नोकऱ्यांचा चोरबाजार! 'त्या' ऑडिओतील मोन्सेरात कोण? महसूलमंत्री संतापले, सखोल चौकशीची केली मागणी

Goa Today's News Live: मंत्री बाबूश यांना माझा पाठिंबा; सर्वच घोटळ्यांची व्हावी न्यायालयीन चौकशी - उत्पल पर्रीकर

Jonty Rhodes: राहण्यासाठी गोवा का निवडला? पर्यटन वादात दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटरने दिलेल्या उत्तराने मने जिंकली

PWD Goa: फक्त एका एक्लिवर मिळणार पिण्याच्या पाण्याचे सर्व अपडेट्स; PDW ची गोवेकरांसाठी नवीन उपाययोजना

Sreejita De: जर्मन नवरा, बंगाली नवरी! प्रसिद्ध अभिनेत्रीने गोव्यात प्रियकरासोबत दुसऱ्यांदा केले लग्न; पाहा Photo

SCROLL FOR NEXT