ग्लोबल

शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या 21 भारतीय विद्यार्थ्यांना पाठवले परत; मोबाईल, व्हॉट्सअप चॅटही तपासले

गोमन्तक डिजिटल टीम

Indian students sent back from USA: एका दिवसात अमेरिकेतून 21 भारतीय विद्यार्थ्यांना परत पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. व्हिसा आणि कागदपत्रांमधील चूक असल्यामुळे त्यांना परत पाठवल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. हे विद्यार्थी आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील आहेत.

सर्व कागदपत्रे पूर्ण होती आणि महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर ते अमेरिकेला जात होते, असा या विद्यार्थ्यांनी दावा केला आहे.

इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, अटलांटा, शिकागो आणि सॅन फ्रान्सिस्को विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासली. यानंतर त्यांना काही काळ चौकशीसाठी ताब्यातही घेण्यात आले आणि नंतर माघारी परतण्यास सांगितले.

माघारी परतण्याचे कोणतेही कारण न दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. दरम्यान, कागदपत्रांमध्ये काहीतरी कमतरता असल्याची विद्यार्थ्यांनी शक्यता व्यक्त केली.

याबाबत अमेरिका किंवा भारत सरकारकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. द हिंदूच्या वृत्तानुसार, 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान ही घटना घडली. कोणतेही कारण न देता विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन आणि व्हॉट्सअप चॅटही अधिकाऱ्यांनी तपासण्यात आले. असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

तसेच विद्यार्थ्यांचे लॅपटॉप आणि सोशल मीडिया अकाउंटही तपासण्यात आले. परत पाठवण्यात आलेले विद्यार्थ्यी मिसूरी आणि साऊथ डकोटा विद्यापीठात शिकण्यासाठी जात होते. विमानतळावर, विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण, व्हिसा, मुलाखत, कर्ज आणि प्रवेशासाठी त्यांनी मदत घेतलेल्या सल्लागारांशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिल्लीला परत जाईपर्यंत त्यांना कोठडीत ठेवण्यात आले होते.

सध्या हे विद्यार्थी भारतात परतले आहेत. इमिग्रेशन अधिकारी विचित्र वागतात आणि प्रश्नांची उत्तरेही देत ​​नाहीत असे अटलांटाहून परतलेल्या एका विद्यार्थ्याने सांगितले.

दूतावास आणि विद्यापीठाने सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही ही कारवाई केल्याचा दावा विद्यार्थ्याने केला आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गेल्या आठवड्यात हजारो विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी रवाना झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT