Indian student brutally beaten with a rod in Sydney: शुक्रवारी पहाटे घडलेल्या धक्कादायक घटनेत, ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याला खलिस्तानी समर्थकांच्या गटाने निर्दयपणे मारहाण केली.
या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या वेस्टमीड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विद्यार्थ्याने त्याच्यावर चार ते पाच खलिस्तानी समर्थकांच्या गटाने हल्ला केल्याची माहिती दिली. त्याने सांगितले की तो शिक्षणाबरोबर ड्रायव्हर म्हणून काम करतो.
सकाळी तो आपल्या गाडीत बसल्यावर खलीस्तानी तेथे पोहोचले आणि त्यांनी हल्ला केला. हल्लेखोरांपैकी एकाने कारचा दरवाजा उघडून त्याच्या डाव्या गालावर रॉड मारला, नंतर इतरांनीही त्याला रॉडने मारायला सुरू केले.
ही घटना पाहणाऱ्या एका व्यक्तीने न्यू साउथ वेल्स पोलिसांना कळवले आणि त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
न्यू साउथ वेल्स पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने पॅरामेडिक्सना घटनास्थळी बोलावले आणि पीडितेला त्याच्या डोक्याला, पायाला आणि हाताला गंभीर दुखापत झाल्याने वेस्टमीड रुग्णालयात नेण्यात आले.
न्यू साउथ वेल्स पोलिसांच्या प्रवक्त्याने ऑस्ट्रेलिया टुडेला एक निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, “शुक्रवार 14 जुलै 2023 रोजी सकाळी 5.40 दरम्यान, कंबरलँड पोलिस एरिया;s अधिकारी, रूपर्ट स्ट्रीट, मेरीलँड्स वेस्टमध्ये हल्ल्याच्या माहितीनंतर हजर झाले.”
भारत सरकारने अद्याप या मुद्द्यावर अधिकृत वक्तव्य केलेले नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.