Sri Sri Ravi Shankar and Acharya Lokesh Muni Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकन काँग्रेसकडून श्री श्री रविशंकर अन् आचार्य लोकेश मुनींचा सन्मान

जागतिक शांतता आणि सौहार्दासाठी काम करणाऱ्या भारतातील दोन अध्यात्मिक गुरुंना अमेरिकन काँग्रेसने मान्यता दिली आहे.

Manish Jadhav

Sri Sri Ravi Shankar and Acharya Lokesh Muni: जागतिक शांतता आणि सौहार्दासाठी काम करणाऱ्या भारतातील दोन अध्यात्मिक गुरुंना अमेरिकन काँग्रेसने मान्यता दिली आहे.

अमेरिकन काँग्रेसने जागतिक शांततेसाठी केलेल्या योगदानाबद्दल श्री श्री रविशंकर आणि जैन आचार्य लोकेश या दोन भारतीय आध्यात्मिक गुरुंना ही मान्यता दिली आहे. या अध्यात्मिक गुरुंना त्यांच्या समाजसेवेशी संबंधित कार्यासाठी हा सन्मान देण्यात आला आहे.

या संदर्भात आपले मत व्यक्त करताना इंडियन अमेरिकन काँग्रेसचे राजा कृष्णमूर्ती म्हणाले की, श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi Shankar) यांनी शांतता, शिक्षण आणि मानवतावादासाठी कार्य केले आहे. भारतीय अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी संसदेचे कनिष्ठ सभागृह 'हाऊस ऑफ

रिप्रेझेंटेटिव्हज'मध्ये सांगितले की, आचार्य श्री श्री रविशंकरजी यांनी जवळपास 40 वर्षांपासून ध्यान आणि योगावर आधारित कार्यक्रमातून जनजागृती केली आहे. या कार्यक्रमांनी जगभरातील व्यक्तींना आंतरिक शांती शोधण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत केली आहे.

'जैन संत डॉ. लोकेश मुनी लहानपणापासून वैदिक तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत आहेत'

जैन संत डॉ. लोकेश मुनी यांच्याविषयी राजा कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, आचार्य डॉ. लोकेश मुनी लहानपणापासूनच जैन, बौद्ध आणि वैदिक तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत आहेत.

लोकेश मुनीजींनी आपले जीवन जैन, बौद्ध आणि वैदिक तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी आणि शिकवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. वेगवेगळ्या धर्मांमध्ये शांतता आणि सहिष्णुता वाढवण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे.

मुनीश्रींनी अनेक ठिकाणी जातीय हिंसाचार कमी करण्यास मदत केली आहे. नुकतेच, त्यांनी गुरुग्राम येथे जागतिक शांतता केंद्र देखील उघडले आहे.

कृष्णमूर्ती म्हणाले की, मुनीजींनी अनेक प्रसंगी सांप्रदायिक हिंसाचार कमी करण्यास मदत केली आणि अलीकडेच भारतातील (India) गुरुग्राम येथे जागतिक शांतता केंद्र उघडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: बाहेर जाणार्‍या दारूच्या बाटल्यांवर आता 'होलोग्राम'!

Starlink in india: एलन मस्क यांच्या कंपनीला भारतात ब्रेक! स्टारलिंकला फक्त 20 लाख कनेक्शनना परवानगी

Mumbai Goa Highway Traffic: LPG गॅस टँकर पुलावरुन खाली कोसळला! मुंबई-गोवा महामार्गावर 10 तासांपासून वाहतूक ठप्प

Kokedama: नारळाच्या काथ्यापासून विघटनशील, जपानी 'कोकेडामा' बनवणारी गोमंतकीय कलाकार 'लेखणी'

Avatar 3 Trailer Launch: नव्या विलेनची एन्ट्री... 2100 कोटींच्या 'अवतार 3' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT