PM Justin Trudeau Dainik Gomantak
ग्लोबल

India Canada Relations: ‘ते पुन्हा डोकं वर काढतायेत...’ भारतीय वंशाच्या खासदाराने खलिस्तान आणि ट्रूडो सरकारवर साधला निशाणा

India Canada Relations: भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध गेल्या काही महिन्यांपासून कमालीचे ताणले गेले आहेत.

Manish Jadhav

India Canada Relations: भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध गेल्या काही महिन्यांपासून कमालीचे ताणले गेले आहेत. खलिस्तानी म्होरक्या हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील कटुता वाढली. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेतून हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. मात्र कॅनडाकडून करण्यात आलेले सर्व आरोप भारताने फेटाळून लावले होते.

यातच आता, कॅनडात खलिस्तानी पुन्हा एकदा डोके वर काढत असल्याचे भारतीय वंशाच्या खासदाराने म्हटले आहे. अलीकडेच खलिस्तान्यांनी हरदीपसिंग निज्जरच्या पुण्यतिथीनिमित्त खलिस्तान समर्थकांना एकत्र येण्याचे आवाहान केले होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मंत्र्यांविरोधात गरळ ओकली होती. दरम्यान आता भारतीय वंशाचे खासदार चंद्र आर्य म्हणाले की, कनिष्क दहशतवादी हल्ल्याला कारणीभूत असलेली विचारधारा कॅनडात पुन्हा डोके वर काढत आहे. या हल्ल्यात 329 निष्पाप लोक मारले गेले होते.

कॅनडाच्या (Canada) संसदेला संबोधित करताना चंद्र आर्य पुढे म्हणाले की, ‘दहशतवादी हल्ल्याला कारणीभूत असलेली विचारधारा आजही येथील काही लोकांमध्ये प्रचलित आहे. त्यांनी संसदेत 23 जून रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वर्धापनदिनानिमित्त एकत्र येण्याचे आणि मारल्या गेलेल्या निष्पाप लोकांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले.’

दरम्यान, चंद्र आर्य यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा खलिस्तानवाद्यांनी निज्जर याच्या हत्येची जयंती साजरी केली. विशेष म्हणजे, कॅनडाच्या संसदेत त्यांच्यासाठी एक मिनिट मौन पाळण्यात आले होते. खलिस्तानी तत्वांनी भारतीय वाणिज्य दूतावासाबाहेर जन न्यायालयाचे आयोजनही केले होते.

सभापती महोदय, मला 23 जून रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मारले गेलेले ते निष्पाप लोक आजही आठवतात. 39 वर्षांपूर्वी खलिस्तानी दहशतवाद्यांनी एअर इंडियाच्या फ्लाइट 182 कनिष्कला बॉम्बने उडवून दिले होते. या हल्ल्यात 329 जणांचा मृत्यू झाला होता. कॅनडाच्या इतिहासात इतका भीषण दहशतवादी हल्ला कधीच झाला नव्हता. आज ती विचारधारा पुन्हा डोके वर काढत आहे, असे चंद्र आर्य यांनी संसदेला संबोधित करताना नमूद केले.

'आता इंदिरा गांधींच्या हत्येचे चित्रण केले जात आहे’

काही दिवसांपूर्वीच, भारताच्या (India) माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या चित्रणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी भारताकडून तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला होता. मात्र, कॅनडाला भारताच्या आक्षेपाचा काहीही फरक पडला नसल्याचे दिसतेय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: रात्री-अपरात्री पोलिस धडकणार घरी! 'गोव्या'त गुन्हेगारांवर करडी नजर; आठ दिवसांत १०५ जणांची चौकशी

Goa Crime: 'पूजा नाईक'च्या ताब्यातील आणखी चार कारगाड्या जप्त! म्हार्दोळ पोलिसांनी आवळल्या 'एजंट'च्या मुसक्या

Kalasa Banduri Project: 'कळसा-भांडुरा'बाबतीत कर्नाटकच्या अडचणी वाढल्या! आता ‘प्रवाह'च्या बैठकीकडे लक्ष

Rashi Bhavishya 25 October 2024: शत्रूंपासून सावधान! प्रवासादरम्यान होऊ शकते मोठी फसवणूक; जाणून घ्या काय सांगतयं या राशीचं भविष्य

अन्.. विठूरायाच्या दर्शनाचे स्वप्न राहिले अपुरे..! डिचोलीच्या बाजारात कोसळून वृद्धा मृत्यूमुखी

SCROLL FOR NEXT