America Crime Dainik Gomantak
ग्लोबल

America Crime: अमेरिकेत पुन्हा एका भारतीयाचा मृत्यू, पोलिसांच्या कारवाईवर उठले प्रश्न; पहिल्या पत्नीने सांगितले...

America Crime News: अमेरिकेतील सॅन अँटोनियो येथे पोलीस कारवाईदरम्यान भारतीय वंशाच्या एका आरोपीचा गोळी लागल्याने मृत्यू झाला.

Manish Jadhav

America Crime News: अमेरिकेतील सॅन अँटोनियो येथे पोलीस कारवाईदरम्यान भारतीय वंशाच्या एका आरोपीचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. पोलीस अधिकारी सचिन साहू (42) (Sachin Sahu) याला पकडण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, त्याने दोन अधिकाऱ्यांना त्याच्या वाहनाने धडक दिली, त्यानंतर पोलिस अधिकारी टायलर टर्नर यांनी त्याच्यावर गोळीबार केला. साहू हा मूळचा उत्तर प्रदेशचा (Uttar Pradesh) आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो कदाचित अमेरिकन नागरिक (American Citizen) असावा.

पोलिसांनी वॉरंट जारी केले

या प्रकरणाची माहिती देताना सॅन अँटोनियो पोलिस विभागाने (San Antonio Police Department) पीटीआयला सांगितले की, 21 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या आधी एका गंभीर हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांना सॅन अँटोनियो येथील चेविओट हाइट्स येथे पाठवण्यात आले.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांना कळले की 51 वर्षीय महिलेला (Women) जाणूनबुजून वाहनाने धडक दिली होती. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संशयित साहू घटनास्थळावरुन पळून गेला होता. पीडित महिलेला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर सॅन अँटोनियो पोलिसांनी साहूविरोधात अटक वॉरंट जारी केले होते.

पोलिस अधिकारी घरी पोहोचले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही तासांनंतर आरोपीच्या शेजाऱ्यांनी साहू परत आल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर तात्काळ पोलिस त्याच्या निवासस्थानी पोहोचले. साहूने दोन अधिकाऱ्यांना आपल्या वाहनाने धडक दिली. दरम्यान, एका अधिकाऱ्याने साहूच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात साहूचा जागीच मृत्यू झाला. एका जखमी पोलिस अधिकाऱ्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. तर दुसऱ्या अधिकाऱ्यावर घटनास्थळीच उपचार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यादरम्यान अन्य कोणीही जखमी झाले नाही. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरु आहे. पोलिस प्रमुख बिल मॅकमॅनस यांनी सांगितले की, पोलिसांनी अद्याप बॉडीकॅम फुटेज पाहिलेले नाही. हे पाहिल्यानंतर आणखी तथ्य समोर येण्याची शक्यता आहे.

पत्नीने ही गोष्ट सांगितली

एका न्यूज पोर्टलमध्ये साहूची पत्नी लीह गोल्डस्टीन काम करते. हिच्या हवाल्याने सांगण्यात आले की, साहूला 'बाइपोलर डिसऑर्डर' होता. गोल्डस्टीनने सांगितले की, “गेल्या 10 वर्षांपासून तो या आजाराने त्रस्त होता. त्याला 'स्किझोफ्रेनिया' चीही लक्षणे आढळून आली होती. 'बायपोलर डिसऑर्डर' हा एक मानसिक आजार आहे, ज्यामुळे व्यक्तीला कधी आनंद तर कधी अत्यंत उदासीनता जाणवते. 'स्किझोफ्रेनिया' हा देखील एक मानसिक आजार आहे, ज्यामध्ये रुग्ण गोंधळलेल्या अवस्थेत राहतो. ती पुढे म्हणाली की, “तो समजू शकत नव्हता की तो नेमका कोणत्या समस्येने ग्रासलेला आहे. त्याला स्वत:चा आवाज ऐकू यायचा." गोल्डस्टीन हळवी आठवण सांगताना म्हणाली की, साहू एक "चांगला" बाप होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pramod Sawant: गोव्याचे CM प्रमोद सावंत यांच्याही बॅगा तपासल्या; कराड विमानतळावर झाले चेकिंग Viral Video

Goa Live Updates: फर्मागुडी आयआयटीत बॉम्ब ठेवल्याचे पत्र!

Tulsi Vivah: गोव्यातील 'व्हडली दिवाळी'; दिंडा, 'धेडा व धेडी... जाणून घ्या काय आहे प्रथा

'Cash For Job Scam'मुळे डागाळली गोव्याची प्रतिमा! कोटयवधींची फसवणूक; Viral Video वरुन खळबळ

Pilgao: पिळगावात तणाव! ट्रकने दिली स्कूटरचालकाला धडक; ग्रामस्थांनी रोखली 'वेदांता'ची वाहतूक

SCROLL FOR NEXT