Indian Expat Murdered In Sharjah UAE Dainik Gomantak
ग्लोबल

Crime News: UAE मध्ये भारतीयाची निर्घुण हत्या, मृतदेहाचे केले 9 तुकडे, बायको-मुलगा गायब; नोकरीनिमित्त शारजाहला गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला

Indian Expat Murdered In Sharjah UAE: परदेशात नोकरी निमित्त गेलेल्या एका भारतीयाची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली.

Manish Jadhav

Indian Expat Murdered In Sharjah UAE: परदेशात नोकरी निमित्त गेलेल्या एका भारतीयाची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. संयुक्त अरब अमिरातीमधील शारजाहमध्ये कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचा खून करण्यात आला असून, त्याचा मृतदेह नऊ तुकड्यात कापलेला आढळला.

ही भयानक घटना जुलै महिन्यात घडल्याचे समोर आले, परंतु तब्बल दोन महिन्यांनंतर जेव्हा त्याच्या कुटुंबाशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही, तेव्हा या प्रकरणाचा उलघडा झाला. मृत व्यक्तीचे नाव एल्विन प्रकाश कुंदर असे असून, त्याचा मृतदेह ओमानकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कारमधून जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, या हत्येनंतर त्याची पत्नी आणि मुलगा देखील गूढ रीतीने गायब आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत एल्विन प्रकाश कुंदर हा गेल्या 14 वर्षांपासून शारजाह विमानतळावर नोकरी करत होता. त्याची पत्नी आणि मुलगा देखील त्याच्यासोबत शारजाहमध्येच राहत होते. त्याचा मुलगा तिथेच दहावीच्या वर्गात शिकत होता, तर पत्नी टीना एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करत होती. प्रकाशच्या कुटुंबातील सदस्यांना संशय तेव्हा आला जेव्हा त्याच्या भावाने, अनिल प्रशांत कुंदर यांनी 20 जुलैच्या आसपास त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. प्रकाशने फोन उचलला नाही, परंतु एक टेक्स्ट मेसेज पाठवून आपण मजेत असल्याचे सांगितले. हा प्रकार कुटुंबाला अत्यंत संशयास्पद वाटला, कारण प्रकाश सहसा मेसेज न करता नेहमी व्हॉईस मेसेज किंवा थेट फोनवर बोलत असे.

जेव्हा अनिल यांनी जवळपास एका आठवड्यानंतर पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर अनिल यांनी शारजाहमध्येच राहणाऱ्या प्रकाशच्या एका वर्गमित्राशी संपर्क साधून त्याची शोधाशोध करण्यास सांगितले. तो वर्गमित्र जेव्हा प्रकाशच्या फ्लॅटवर पोहोचला, तेव्हा तिथे कोणीही नव्हते. सोसायटीच्या वॉचमनने आणि कंपनीच्या एचआर डिपार्टमेंटने असे सांगितले की, प्रकाश भारतात परत गेला आहे. मात्र, कुटुंबीयांनी खात्री केली असता प्रकाश भारतात आलेलाच नव्हता. त्याच्या पासपोर्टची कसून चौकशी केल्यानंतर तो युएईमध्येच असल्याचे स्पष्ट झाले.

अखेर पोलिसांत (Police) तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलिसांनी शोध मोहीम राबवली असता, ओमान मार्गावरील एका कारमध्ये प्रकाशचा मृतदेह दोन वेगवेगळ्या बॅग्जमध्ये नऊ तुकडे करुन भरलेला आढळला. या भीषण हत्याकांडात मृताच्या पत्नीच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT