America Dainik Gomantak
ग्लोबल

US Court: भारतीय-अमेरिकन वकील रूपाली देसाई यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती

अमेरिकन सिनेटने भारतीय-अमेरिकन वकील रुपाली देसाई यांची न्यायाधीश म्हणुन नियुक्ती केली आहे.

दैनिक गोमन्तक

अमेरिकन सिनेटने भारतीय-अमेरिकन वकील रुपाली एच देसाई (Rupali Desai) यांच्या अमेरिकेच्या कोर्ट ऑफ अपील फॉर द नाइन्थ सर्किटमध्ये नियुक्ती केली आहे. यासह, या शक्तिशाली न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त होणारी ती दक्षिण आशियाई वंशाची पहिली न्यायाधीश ठरली आहे. (indian american lawyer rupali desai becomes judge America senate confirms)

डेमोक्रॅटिक पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष या दोन्ही यूएस पक्षांच्या 67 खासदारांनी गुरुवारी, 4 ऑगस्ट रोजी देसाईंच्या समर्थनार्थ मतदान (Voting) केले. तर 29 सदस्यांनी त्यांच्या विरोधात मतदान केले. नवव्या सर्किटचे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथे आहे. देशातील 13 अपीलीय न्यायालयांपैकी हे सर्वात मोठे न्यायालय आहे.

"देसाई यांच्या नामांकनाचे राजकीय आणि वैचारिक वर्तुळात मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले यात आश्चर्य नाही," असे सिनेट न्यायमूर्ती समिती आणि बहुसंख्य व्हीप डिक डर्बिन यांनी सांगितले. याशिवाय त्यांच्या नामांकनाला राज्याचे न्यायाधीश, कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी आणि अग्निशमन सेवेशी संबंधित तीन संस्थांनी पाठिंबा दिला आहे. वकील म्हणून 16 वर्षांचा अनुभव असलेले देसाई नवव्या सर्किटमध्ये विलक्षण योगदान देतील.

रुपाली एच देसाई 'कॉप्समिथ ब्रोकलमन' मध्ये भागीदार आहे. जिथे ती 2007 पासून कायद्याचा अभ्यास करत आहे. त्यांनी 2005 ते 2006 या काळात यूएस कोर्ट ऑफ अपील फॉर द नाइन्थ सर्किटमध्ये मुख्य न्यायाधीश मेरी श्रोडरचे 'कायदा लिपिक' म्हणून काम केले. देसाई यांनी 2005 मध्ये अॅरिझोना विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली.

अ‍ॅरिझोनाचे सिनेटर क्रिस्टन सिनेमा म्हणाले की, देसाई यांची या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल ऍरिझोनाला अभिमान वाटतो. 'इंडियन अमेरिकन इम्पॅक्ट'चे कार्यकारी संचालक नील मखिजा म्हणाले की, अॅरिझोना अॅटर्नी म्हणून देसाई यांच्या धाडसी आणि प्रेरणादायी कामामुळे त्यांना एक अशी प्रतिष्ठा मिळाली आहे. ज्याचा त्यांना नक्कीच अभिमान वाटेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vinoo Mankad Trophy: गुजरातचा गोव्यावर दणदणीत विजय! 5 लढतीतील चौथा पराभव; गटसाखळीत हाराकिरी

Goa Today's News Live: वीज कोसळून 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू? कोलवा येथे रुमच्या बाहेर आढळला मृतदेह

Netravali: 'एसी'त बसणारे ग्रामीण जनतेला सुखाने जगू देत नाहीत! व्‍याघ्र प्रकल्‍पावरुन फळदेसाईंचा टोला; नेत्रावळी ग्रामस्थांचा विरोध

Rama Kankonkar: 'मोबाईलचा डेटा फॉरमॅट का केला'? हल्लाप्रकरणी रामा, जेनिटोंचे वकील भिडले; अटक बेकायदेशीर असल्याचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; दिगंबर कामत लहान कसे?

SCROLL FOR NEXT