पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचे यूएई अन् सौदी अरेबियाला मदतीचे आवाहन

लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी स्वत: इतर देशांशी संपर्क साधून त्यांना मदत पॅकेजचे आवाहन केले आहे.
Qamar Javed Bajwa
Qamar Javed BajwaDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानची (Pakistan) आर्थिक स्थिती किती नाजूक आहे हे सर्वांनाच माहिती आहे आणि अश्यातच आर्थिक परिस्थितीचा अंदाज लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी (Qamar Javed Bajwa) स्वत: इतर देशांशी संपर्क साधून त्यांना मदत पॅकेजचे आवाहन केले आहे. वृत्तानुसार, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी अडचणीत असलेल्या पाकिस्तानला आर्थिक मदत सुनिश्चित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आता सौदी अरेबिया आणि यूएईशी संपर्क साधला असल्याचे समोर येत आहे. (Pakistan Army Chief General Bajwa has appealed for an aid package to UAE and Saudi Arabia)

Qamar Javed Bajwa
UPच्या शीख महिलेची USमध्ये आत्महत्या, मृत्यूपूर्वी पतीवर केले गंभीर आरोप

काही दिवसांपूर्वी जनरल बाजवा यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून 1.7 अब्ज डॉलरचे मदत पॅकेज मिळविण्यासाठी अमेरिकेकडे मदत मागितली होती. पाकिस्तानच्या दैनिक वृत्तपत्र 'द एक्सप्रेस ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, या महिन्याच्या अखेरीस IMF कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे, ज्यामध्ये पाकिस्तानसाठी 1.2 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा पुढील हप्ता औपचारिकपणे मंजूर केला जाणार आहे.

IMF ची इच्छा आहे की पाकिस्तानने आर्थिक मदत मिळवण्यासाठी आपल्या मित्र देशांची वचनबद्धता सुनिश्चित करावी आणि असे मानले जाते की IMF ने पाकिस्तानला खात्रीपूर्वक हमी देण्यास सांगितले आहे की त्याचे मित्र त्यांच्या बाह्य गरजांसाठी $ 4 अब्ज प्रदान करतील.

Qamar Javed Bajwa
Elon Musk: इलॉन मस्क यांचा ट्विटरवर फसवणुकीचा आरोप, प्रकरण कोर्टात दाखल

एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तात म्हटले की, आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाकिस्तान सौदी अरेबिया, यूएई आणि चीन या प्रमुख मित्र राष्ट्रांशी चर्चा देखील करत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (PM Shehbaz Sharif) यांनी एप्रिलमध्ये सौदी अरेबियाला भेट दिली तेव्हा रियाधने त्यांना कोणतेही ठोस आश्वासन न दिल्याने ते रिकाम्या हाताने परतले होते.

UAE सुद्धा पाकिस्तानच्या मदतीला येण्यास तयार नाही. कर्ज देण्याऐवजी यूएईने पाकिस्तानला शेअर्स आणि मालमत्ता खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. 'द एक्सप्रेस ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या लष्कराने आर्थिक मदतीसाठी सौदी अरेबिया आणि यूएई या दोन्ही देशांतील अधिकाऱ्यांशी बोलल्याचे समजले जाते आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com