Pakistan Minister Hanif Abbasi Dainik Gomantak
ग्लोबल

India Pakistan Tension: 'आता भारताची खैर नाही...', ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या मंत्र्याने ओकली गरळ

Pakistan Minister Hanif Abbasi: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने पाकिस्तानवर धडक कारवाई करुन घेतला. गेल्या 15 दिवसांपासून पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या मागणीने जोर धरला होता.

Manish Jadhav

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने पाकिस्तानवर धडक कारवाई करुन घेतला. गेल्या 15 दिवसांपासून पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या मागणीने जोर धरला होता. बुधवारी (7 मे) रात्री 1 वाजता भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे 9 तळ उडवून दिले. विंग कमांडर व्योमिका सिंग, कर्नल सोफिया कुरेशी आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत ऑपरेशनची माहिती दिली. मात्र भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानचा बिथरला आहे. पाकिस्तानचे मंत्री हनीफ अब्बासी यांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध गरळ ओकली.

काय म्हणाले हनीफ अब्बासी?

दरम्यान, भारताच्या (India) कारवाईनंतर पाकिस्तानने धमक्या देण्यास सुरुवात केली. पाकिस्तानचे मंत्री हनीफ अब्बासी यांनी लाईव्ह येत भारताला खुली धमकी दिली. अब्बासी म्हणाले की, ''भारताकडून करण्यात आलेल्या कारवाईला आता आम्ही प्रत्युत्तर देऊ. ज्यावेळी आम्ही प्रत्युत्तरादाखल कारवाई करु तेव्हा शेकडो लोक मारु.''

ते पुढे म्हणाले की, ''आम्ही भारताला आधीच स्पष्ट केले होते की, या हल्ल्यात आमची कोणतीही भूमिका नाही. मुंबई आणि दिल्लीतील हल्ल्यांशीही आमचा संबंध नव्हता. त्याचप्रमाणे, आम्ही पहलगामवर हल्ला केला नाही.''

देशाला संबोधित करताना पाकिस्तानी मंत्र्यांनी पुढे म्हटले की, ''हा पाकिस्तानसाठी (Pakistan) एक नाईट मेयर होता. आमचे सैन्य, मंत्री आणि पाकिस्तानचे लोक रात्रभर जागे होते. आम्हाला क्षणभरही झोप लागली नाही. आता भारताने तयार रहावे. आम्ही शांत बसणार नाही.''

दिल्लीवर हल्ला करणे आमच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता. पण आम्ही ते केले नाही. आता आम्ही ट्रेलर दाखवला आहे. आता आमचा पाणीपुरवठा खंडित केला तर हल्ला करु, असेही शेवटी हनीफ म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT