
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने जोरात तयारी सुरु केली आहे. पाकिस्तानविरोधात भारताने तात्काळ लष्करी कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे. याचदरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला. 7 मे रोजी सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश केंद्राकडून राज्यांना देण्यात आले आहेत. शेवटचे अशा प्रकारचे मॉक ड्रिल 1971 मध्ये झाले होते, जेव्हा भारत पाकिस्तानविरुद्ध दोन आघाड्यांवर युद्ध लढत होता.
हवाई हल्ल्याचा इशारा देणारा सायरन सक्रिय केला जाईल.
कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्यास स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण सामान्य नागरिक, विद्यार्थी इत्यादींना दिले जाईल.
ब्लॅकआउटची व्यवस्था केली जाईल. याचा अर्थ असा की, गरज पडल्यास वीज बंद करावी जेणेकरुन शत्रूला कोणतेही लक्ष्य दिसू नये.
महत्त्वाचे कारखाने आणि तळ लपवण्यासाठी लवकरच व्यवस्था केली जाईल.
फिरोजपूर कॅन्टोन्मेंट परिसरात रविवारी 30 मिनिटांचा ब्लॅकआउट सराव करण्यात आला, ज्यामध्ये रात्री 9 ते 9:30 वाजेपर्यंत सर्व दिवे बंद करण्यात आले. जर कोणत्याही वाहनाचे दिवे चालू आढळले तर ते बंद केले जात होते. पोलिस पूर्णपणे सतर्क होते आणि प्रत्येक चौकात तैनात होते. फिरोजपूर कॅन्टोन्मेंट पोलिस स्टेशनचे एसएचओ गुरजंत सिंह यांनी ही माहिती दिली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan) तणाव कमालीचा वाढला असताना गृह मंत्रालयाने हे निर्देश दिले आहेत. या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली, यामध्ये बहुतेक पर्यटक होते. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक धोरणात्मक पावले उचलली आहेत. यामध्ये सिंधू पाणी करार स्थगित करणे, पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे, अटारी चेकपोस्ट बंद करणे आणि सर्व श्रेणीतील टपाल सेवा बंद करणे यांचा समावेश आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने सशस्त्र दलांना त्यांच्या वेळेनुसार आणि पद्धतीने निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. या हल्ल्यानंतर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावून पुढील रणनितीवर चर्चा केली. तसेच, दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या (सीसीएस) बैठकीत दहशतवादी हल्ल्याचे सीमापार कनेक्शन असल्याचे समोर आले.
दुसरीकडे, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, भारताने (India) पाकिस्तानमधून सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात आणि वाहतुकीवर तात्काळ बंदी घातली आहे, ज्यामुळे द्विपक्षीय व्यापाराला ब्रेक लागला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.