India vs Pakistan: भारताने 6 आणि 7 मे च्या मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoJK) मधील दहशतवादी ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले केले. या धडक कारवाईनंतर भारताने पाकिस्तानच्या ‘डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स’ (DGMO) यांना आपले मिशन पूर्ण झाल्याची माहिती दिली होती. या हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. प्रत्युत्तरात पाकिस्तानने देखील भ्याड प्रतिहल्ल्याची धमकी दिली होती, मात्र ‘इंडिया टुडे’च्या ‘ओपन-सोर्स इंटेलिजन्स’ (OSINT) टीमने कराची आणि ग्वादर बंदरांच्या सॅटेलाईट फोटोंचे विश्लेषण केले असता पाकिस्तान नौदलाची बचावात्मक भूमिका समोर आली.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पाकिस्तानी नौदलाच्या (PN) युद्धनौका कराचीतील त्यांच्या नौदल गोदीतून हलवण्यात आल्या होत्या, असे सॅटेलाईट फोटोमधून स्पष्ट झाले. तर, इतर युद्धनौकांना इराण सीमेपासून अवघ्या 100 किमी अंतरावर असलेल्या ग्वादर बंदरात हालवण्यात आले होते.
याबाबत बोलताना 1971 च्या कराची बंदरावरील हल्ल्यात सहभागी झालेले नौदल उप-प्रमुख (निवृत्त) सुरेश बंगारा यांनी पाकिस्तान (Pakistan) नौदलाच्या ऑपरेशनल तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “7 मे रोजी आमच्या दहशतवादी पायाभूत सुविधांवरील हल्ल्यानंतरही पाकिस्तानच्या तीनही सैन्य दलांनी पूर्णपणे सतर्क असायला हवे होते. पण, त्यांची आघाडीची युद्धनौका अजूनही बंदरातच दिसणे त्यांच्या कमी ऑपरेशनल तयारीचे द्योतक होते.” त्यांनी पुढे सांगितले की, पाकिस्तानी नौदलाने आपल्या युद्धनौका व्यापारी बंदरांमध्ये ठेवून क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून वाचण्याचा प्रयत्न केला. तसेच, लष्करी विमानांना कमर्शियल विमानांच्या जवळून उडवून त्यांनी नागरिकांना ढाल म्हणून वापरण्याची वृत्तीही दाखवली, असे त्यांनी म्हटले.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या सहा महिने आधी पाकिस्तान नौदलाने ‘स्वदेशी बनावटीचे’ P282 जहाज-प्रक्षेपित बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केल्याचा दावा केला होता. याची 350 किमी श्रेणी असल्याचा दावाही त्यांनी केला होता. मात्र, मे 2025 मध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु झाल्यावर वेगळेच चित्र दिसले. ‘मॅक्सार टेक्नॉलॉजीज’ या अंतराळ कंपनीकडून मिळालेल्या उपग्रह चित्रांमधून हे समोर आले की, पाकिस्तानच्या ‘झुल्फिकार’ श्रेणीतील अर्ध्या युद्धनौका इतर जहाजांसह ग्वादर येथे उभ्या होत्या. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा ‘मुकुटमणी’ समजले जाणारे हे बंदर तात्पुरते नौदलाचे आश्रयस्थान बनले होते.
10 मे पर्यंत ग्वादरचा कंटेनर स्टोरेज एरिया रिकामा होता, पण त्याचे डॉक्स लष्करी जहाजांनी भरले होते. त्यात दोन झुल्फिकार श्रेणीतील फ्रिगेट्स, दोन सर्वात मोठ्या ‘तुघ्रिल’ श्रेणीतील फ्रिगेट्स, अमेरिकेने बनवलेली फ्रिगेट आणि दोन सागरी गस्त जहाजे होती.
भू-गुप्तचर संशोधक डेमियन सायमन यांच्या मते, “ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू जहाजाने म्हणजेच आयएनएस विक्रांतने आपले पहिले युद्ध प्रशिक्षण केले. नौदलाच्या या हालचालीने पाकिस्तानवर मोठा दबाव निर्माण झाला. भारताने कराचीवर संभाव्य हल्ल्याची तयारी केल्याने पाकिस्तानने आपली जहाजे व्यापारी बंदरात हलवली.”
याआधीही भारतीय नौदलाने (Indian Navy) कराचीवर हल्ला करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. व्हाइस ॲडमिरल ए.एन. प्रमोद यांनी मे 2025 मध्ये सांगितले होते की, “आमचे सैन्य अरबी समुद्रात निर्णायक भूमिकेत तैनात होते आणि आमच्या इच्छेनुसार कराचीसह समुद्रातील आणि जमिनीवरील निवडक लक्ष्यांवर हल्ला करण्याची पूर्ण तयारी होती.” नवीन सॅटेलाईट फोटोंवरुन हे स्पष्ट झाले की, संघर्षादरम्यान पाकिस्तानचा नौदल ताफा विखुरला गेला होता आणि त्यांना लपण्यास भाग पाडण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.