India statement on Pakistan in UNSC Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तान दहशतवादाची खाण, UN मध्ये भारताने दिले प्रतिउत्तर

काश्मिरी दहशतवाद्यांचे (Kashmiri Terrorists) पालनपोषण करणाऱ्या पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात भारताविरुद्ध पुन्हा एकदा गरळ ओकली आहे.

दैनिक गोमन्तक

इस्लामाबाद: काश्मिरी दहशतवाद्यांचे (Kashmiri Terrorists) पालनपोषण करणाऱ्या पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात भारताविरुद्ध पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. 1989 पासून भारताने 96,000 काश्मिरींची हत्या केल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी केला आहे. भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले की, "भगव्या पक्षाशी संलग्न अतिरेकी हिंदू गट भारतात मुस्लिमांच्या हत्याकांडावर उघडपणे बोलत आहेत.'' तर दुसरीकडे भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

पाकिस्तानच्या या खोट्या आरोपाला उत्तर देताना भारताच्या स्थायी मिशनचे समुपदेशक आर मधुसुदन म्हणाले , पाकिस्तानचा इतिहास दहशतवाद्यांना पालणपोषण करण्याचा राहिला आहे. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना पाकिस्तानचा पाठिंबा होता. ओसामा बिन लादेनही पाकिस्तानातील एबोटाबाद शहरात सापडला होता.

दरम्यान, जम्मू-काश्मीर आणि लडाखचा संपूर्ण परिसर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि पुढेही राहील, असंही भारताने एकदा स्पष्ट केलं होतं. यापूर्वीही पाकिस्तानने काश्मीरमधील कथित अत्याचाराकडे लक्ष वेधण्याची आणि त्याला जबाबदार असलेल्या भारतीय अधिकारी आणि नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी सुरक्षा परिषदेकडे केली होती. अफगाणिस्तानपासून पीओकेपर्यंत दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानने भारत हा दक्षिण आशियातील दहशतवादाचा गड बनला असल्याचा दावाही केला आहे.

पाकिस्तानच्या ढोंगीपणाचा पर्दाफाश करत भारतीय वाणिज्य दूत म्हणाले की, जगाला माहीत आहे की, पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो. त्याचबरोबर त्यांना आवश्यक ती मदतही करतो. तसेच दहशतवाद्यांना उघडपणे पाठिंबा देण्याचा इतिहासही पाकिस्तानचा राहीला आहे. पाकिस्तान दहशतवादाला शह देतो हे संपूर्ण जगाला माहिती आहे. यूएनएससीने बंदी घातलेल्या दहशतवाद्यांपैकीही बहुतांश दहशतवादी पाकिस्तानात राहतात. एवढचं नाही तर आज जगभरात जे दहशतवादी हल्ले होत आहेत, त्याचा थेट संबंधही पाकिस्तानशी आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री ओसामा बिन लादेनला केवळ पाठिंबा देत नाहीत तर त्याच्या मार्गाचा अवलंब करतात. याची आठवणही मधु सुदन यांनी सुरक्षा परिषदेला करुन दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT