पांढऱ्या केसांची चेष्टा करणाऱ्या लोकांना होतोय एनाच्या केसांना हात लावण्याचा मोह

लहानपणी एनाच्या पांढर्‍या केसांमुळे लोक तीची खिल्ली उडवत असत, पण आता तीच्या 5 फूट लांब चांदीसारख्या केसांचे लाखो लोकं चाहते आहेत.
 Anna Shepherd hair
Anna Shepherd hairInsta/@prettyshepherd
Published on
Updated on

केस पांढरे होणे ही आजकाल बर्‍याच लोकांसाठी समस्या बनली आहे. काही लोक त्यांना काळे करण्यासाठी खूप मेहनत घेतात, तर काही लोक हंगेरीच्या (Hungary ) एना शेफर्डसारखे (Anna Shepherd) आहे त्या नैसर्गिक केसांचा स्विकार करतात.

लहानपणी एनाच्या पांढर्‍या केसांमुळे लोक तीची खिल्ली उडवत असत, पण आता तीच्या 5 फूट लांब (Immature Hair Greying) चांदीसारख्या केसांचे लाखो लोकं चाहते आहेत. व्यवसायाने शेतकरी, असलेल्या एना शेफर्डचे केस अगदी लहान वयातच पांढरे होऊ लागले. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी तिच्या पांढर्‍या केसांमुळे मुले शाळेत तिची चेष्टा करायची पण एनाने तिचे केस असेच राहू दिले. वयाच्या 14 व्या वर्षापासून तीने केसांना कात्री लागणे बंद केले.

 Anna Shepherd hair
Russia: व्लादिमीर पुतीन यांनी ‘दुश्मन’ एलेक्सी नवलनी यांना 'दहशतवादी' म्हणून केले घोषित

आता 30 वर्षांच्या एनाचे केस 5 फूट लांब आहेत आणि ते चांदीसारखे पांढरे आणि चमकदार आहेत. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, लहानपणी लोक तिला डिस्नेलँडची व्हॅम्प क्रुएला म्हणायचे. तीला वाईट वाटले पण तीने आपल्या नैसर्गिक केसांना आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनवले.

केस वाढल्यानंतर तिने त्यांची विशेष काळजी घेतली. अॅना म्हणते की ती महिन्यातून एकदा तिचे केस धुते कारण ते तिच्यासाठी सोयीचे आहे. इतकंच नाही तर ती आठवडाभर केसही करत नाही. एनाच्या या चांदीच्या केसांचे चाहतेही काही कमी नाहीत. इन्स्टाग्रामवर 16000 लोक तीला फॉलो करतात आणि तिच्या गुडघ्यापर्यंतच्या केसांची प्रशंसा करतात.

 Anna Shepherd hair
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन सापडले नव्या वादात

ज्या व्हिडिओमध्ये तिने तिच्या फॉलोअर्सना सांगितले की ती महिन्यातून एकदा केस धुते तो जवळपास दहा लाख लोकांनी पाहिला होता. शाळेत असताना तिला नेहमी तिच्या पांढर्‍या केसांची काळजी वाटायची, पण नंतर तिला ते आवडू लागले. सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे तिचे काही पुरुष चाहते तिच्या केसांना स्पर्श करण्यासाठी देखील पैसे देण्यास तयार आहेत. शेतकरी असल्याने, एनाला लांब केस ठेवणे सोपे वाटते, कारण त्यासाठी स्टाइलची आवश्यकता नसते. बॉयफ्रेंडसोबत शेतात काम करताना ती अनेकदा केसांचा बन बनवते. गरज असेल तेव्हा ती केसांना तेल लावते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com