S. Jayshankar
S. Jayshankar Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानच्या आर्थिक संकटात भारत करणार मदत? जयशंकर म्हणाले...

दैनिक गोमन्तक

Pakistan Economic Crisis: भारताचा शेजारी देश पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानच्या नागरिकांना उदर्निवाहासाठीदेखील हाल सहन करावे लागत आहेत. आयएमएफने देखील कर्ज देण्यासाठी पाकिस्तानसमोर काही अटी ठेवल्या आहेत.

आता भारताने पाकिस्तानला मदत करण्यावर वक्तव्य केले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर हे याबाबत वक्तव्य केले आहे. कोणताही व्यक्ती अचानक अशा परिस्थितीत पोहचत नाही.

आज भारताचे पाकिस्तानबरोबर असे कोणतेही संबंध नाहीत ज्याद्वारे भारत सरळ पाकिस्तानच्या मदतीच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकेल. यातून बाहेर निघण्यासाठी पाकिस्तानलाच कोणतातरी मार्ग काढावा लागेल. त्याचबरोबर पाकिस्तानची कामे आणि त्याने घेतलेले निर्णय यावर पाकिस्तानचे भविष्य निर्भर आहे, असे एस.जयशंकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, एस.जयशंकर यांनी पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा दिल्याने दोन्ही देशातल्या संबंधात तणाव निर्माण झाल्याचे म्हटले आहे. याआधी भारताने श्रीलंके( Srilanka)त आर्थिक आणिबाणी निर्माण झाली होती तेव्हा श्रीलंकेला मोठी मदत केली होती. भारताची नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्याची भूमिका असते असे एस.जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : दोन्‍ही जागा ‘इंडिया’च जिंकणार! विरियातो फर्नांडिस

Siolim News : देशाच्या अधोगतीस काँग्रेस जबाबदार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Israel Hamas War: इस्रायलचा गाझावर पुन्हा हवाई हल्ला, अनेक घरांवर डागली क्षेपणास्त्रे; लहान मुलांसह 13 जणांचा मृत्यू

Goa News : राज्यात ७० टक्क्यांहून अधिक मतदान अपेक्षित! सदानंद शेट तानावडे

Crime News : काणकोणात बारचालकाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाजवळ गावठी बॉम्ब, काडतुसेही सापडल्याने तर्कवितर्क

SCROLL FOR NEXT