Income Tax: दिवाळखोर PAK मधील जनता बेहाल, 35 टक्क्यापर्यंत भरावा लागतोय टॅक्स!

Pakistan: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी भारतात 2023 चा अर्थसंकल्प सादर केला.
Pakistani Citizen
Pakistani Citizen Dainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी भारतात 2023 चा अर्थसंकल्प सादर केला. यादरम्यान अर्थसंकल्पात आयकर स्लॅबमध्ये बदल करण्याची घोषणा करण्यात आली.

विशेष म्हणजे, लोकांना दिलासा देतानाच लोकांना करात सवलत मिळावी यासाठी बजेट स्लॅबमध्ये वाढ करण्यात आली.

त्याचवेळी, शेजारील देश पाकिस्तानमधील जनता महागाईच्या झळा सोसत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानमध्ये करामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

पाकिस्तान

पाकिस्तानमधील (Pakistan) आर्थिक संकट अधिक गडद होत चालले आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती झपाट्याने ढासळत आहे. यासोबतच पाकिस्तानातील महागाईही शिगेला पोहोचली आहे.

त्याचबरोबर, पाकिस्तानातील जनताही आयकराच्या ओझ्याखाली दबली जात आहे. पाकिस्तानमध्येही लोकांच्या उत्पन्नावर कर वसूल केला जातो. अशा परिस्थितीत पाकिस्तानमधील लोकांच्या उत्पन्नावर किती कर आकारला जातो ते जाणून घेऊया.

Pakistani Citizen
Pakistan Economic Crisis: कंगाल PAK ला आता अफगाण तालिबानने दिला मोठा झटका, बॉर्डर केली बंद

आयकर

वास्तविक, पाकिस्तानमध्ये पगारदार आणि पगार नसलेल्या लोकांना स्वतंत्रपणे कर भरावा लागतो. पाकिस्तानमध्ये 6 लाख रुपये कमावणाऱ्यांना कोणताही कर भरावा लागत नाही.

यानंतर 12 लाखांपर्यंत वार्षिक पगारदारांसाठी 2.5 टक्के, 12 लाख ते 24 लाखांपर्यंत 12.5 टक्के, 24 लाख ते 36 लाखांसाठी 20 टक्के, 36 लाख ते 60 लाखांसाठी 25 टक्के, 60 लाखांपर्यंत 32.5 टक्के लाख ते 1.20 कोटी आणि 1.2 वरील उत्पन्नावर 35% कराची तरतूद आहे.

डॉलर किंमत

पाकिस्तानमध्ये महागाई (Inflation) सातत्याने वाढत आहे. यासोबतच, पाकिस्तानमध्ये डॉलरचे मूल्यही जास्त आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये रुपयाचे मूल्य 263 रुपये आहे. त्याचवेळी, भारतात 1 यूएस डॉलरची किंमत सुमारे 82.85 रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com