Dawood Ibrahim Dainik Gomantak
ग्लोबल

Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिम भारतात? UNच्या रिपोर्टवर भारताचा तीव्र आक्षेप, कडक शब्दात ताकीद देत केला थेट सवाल

India Objects To UN Report On Dawood Ibrahim location: संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN) दहशतवाद विरोधी आणि मानवाधिकार प्रकरणांचे स्पेशल रॅपोर्टियर बेन सॉल यांनी जुलै महिन्यात सादर केलेल्या एका अहवालावर भारताने अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप घेतला.

Manish Jadhav

India Objects To UN Report On Dawood Ibrahim location: संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN) दहशतवाद विरोधी आणि मानवाधिकार प्रकरणांचे स्पेशल रॅपोर्टियर बेन सॉल यांनी जुलै महिन्यात सादर केलेल्या एका अहवालावर भारताने अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप घेतला असून, त्याबाबत स्पष्टीकरण मागितले. या अहवालात ओसामा बिन लादेनप्रमाणेच कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम हा देखील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक असून तो सध्या भारतात राहत असल्याचा दावा करण्यात आला.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!

आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

दरम्यान, भारताने या गंभीर तथ्यात्मक चुकीवर आक्षेप घेत विशेष अहवालकारांना या चुकीची जाणीव करुन दिली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या या प्रकारच्या चुकीच्या माहितीमुळे जागतिक स्तरावरील या मोठ्या संस्थेची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते, अशी सक्त ताकीद भारताने दिली. तसेच, अशा विशेष अहवालकारांना युएनकडून वेतन मिळत नाही, त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रभावाखाली न येता वस्तुस्थिती मांडणे अपेक्षित असल्याचे भारताने स्पष्ट केले.

संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी मिशनचे फर्स्ट सेक्रेटरी रघु पुरी यांनी स्पष्ट केले की, दाऊद इब्राहिमचे नाव 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले, मात्र तो त्यापूर्वीच भारत सोडून पळून गेला. अल-कायदा आणि ओसामा बिन लादेनसोबतच्या त्याच्या संबंधांमुळे त्याला मोस्ट वॉन्टेड घोषित करण्यात आले. पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय दिला असून, अल-कायदासारख्या संघटनांच्या माध्यमातून भारतामध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम पाकिस्तान करत आहे.

दाऊद हा आजही भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार असून, तो पाकिस्तानातच लपून बसला आहे; अगदी त्याच पाकिस्तानात जिथे ओसामा बिन लादेन राहत होता आणि जिथे त्याला कंठस्नान घालण्यात आले. लादेन हा पाकिस्तानच्या ज्या अबोटाबाद शहरात लपला होता, तिथे पाकिस्तानी सैन्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा तळ देखील होता, याकडे भारताने पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधले.

रघु पुरी यांनी पुढे सांगितले की, 26/11च्या हल्ल्यातील मास्टरमाइंडसह अनेक वॉन्टेड दहशतवादी गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानात आश्रयास आहेत. भारताने अनेकदा पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडे या दहशतवाद्यांची माहिती मागितली, परंतु पाकिस्तान प्रत्येक वेळी टाळाटाळ करत आला. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांपासून दाऊद इब्राहिम हा भारताचा मोस्ट वान्टेड शत्रू आहे. आजतागायत भातीय सुरक्षा यंत्रणा त्याचा शोध घेत असून, त्याची माहिती देणाऱ्याला मोठे इनामही जाहीर करण्यात आले आहे.

जोपर्यंत भारत (India) या कुख्यात दहशतवाद्याला बेड्या ठोकत नाही, तोपर्यंत तो मोस्ट वान्टेड राहील आणि पाकिस्तानातील दहशतवादाची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी भारताची लढाई यापुढेही अशीच सुरु राहील. याचबरोबर, भारताने आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत खडसावले की, जम्मू-कश्मीर आणि लद्दाख हे भारताचे अभिन्न अंग आहेत आणि नेहमीच राहतील. पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या विरोधात बिनबुडाची निवेदने देऊन केवळ जागतिक स्तरावर अपप्रचार करत असतो.

भारत नेहमीच पाकिस्तानचे हे खोटे दावे फेटाळत आला आहे आणि भविष्यातही फेटाळत राहील, कारण संपूर्ण जगाला माहीत आहे की, पाकिस्तान हाच दहशतवादाचा प्रमुख गड आहे. पाकिस्तानने हा पोकळ दावा सोडत वास्तवाचा स्वीकार करावा, यामध्ये त्याचे हित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congress Party: 'राहुल गांधींची सभा पार्किंगच्या जागेत, ही काँग्रेसची नामुष्की’; दिगंबर कामत यांचा टोला

North Goa Final Voter List: उत्तर गोव्याची अंतिम मतदारयादी 4 जानेवारीला; वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्याची संधी

Bhuvneshwar Kumar World Record: भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियात कमबॅक! तब्बल 1,430 दिवसांनंतर केली गोलंदाजी, पहिल्याच 2 चेंडूंवर नोंदवला विश्वविक्रम

Goa Under 23 Cricket: दिशांक मिस्कीनची एकाकी झुंज! नाबाद 97 धावांसह गोव्याला बिहारविरुद्ध विजयाची संधी

Ranji Trophy 2026: 40 पैकी 38 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या; गोव्याच्या फलंदाजांची रणजीत दयनीय अवस्था

SCROLL FOR NEXT