Russia-Ukraine Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine: रशिया-युक्रेन युध्दादरम्यान भारताची मोठी तेल खरेदी, रशियाने...

Russia-Ukraine: ज्यावेळी युरोपीय युनियन आणि अमेरिकाने रशियाच्या तेलाच्या दर कमी केले होते त्यावेळी रशिया भारताला तेल निर्यात करण्यात उच्च स्तरावर होता.

दैनिक गोमन्तक

Russia-Ukraine: भारताचे रशियाकडून कच्चे तेल आयात करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. आता मात्र भारताने रशियाकडून प्रतिदिन 10 लाख बॅरल कच्चे तेल आयात करुन विक्रम केला आहे.

मागच्या काही महिन्यात भारत रशियाकडून कच्चेतेल आयात करणारा सर्वात मोठा आयातदार बनला आहे. रशियाने डिसेंबर महिन्यात 1.19 मिलियन बॅरल प्रतिदिन कच्च्या तेलाची निर्यात केली आहे. ज्यावेळी युरोपीय युनियन आणि अमेरिकाने रशियाच्या तेलाच्या दर कमी केले होते त्यावेळी रशिया भारताला तेल निर्यात करण्यात उच्च स्तरावर होता. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान अमेरिकेने रशियावर प्रतिबंध घातले होते. त्याचबरोबर, इतर देशांनीसुद्धा रशियाकडून तेल खरेदी करु नये असे आवाहन अमेरिका आणि युरोपीय देशांनी केले होते. मात्र याच दरम्यान भारत-रशिया यांच्यातील कच्च्यातेलाचा व्यापार वाढल्याचे दिसून आले आहे.

मागच्या काही महिन्यांमध्ये सौदीअरेबिया आणि इराकला मागे सोडल्यानंतर रशिया भारताला कच्चे तेल पुरवणारा सर्वात मोठा पुरवठादार झाला आहे. भारत इतर देशांकडून 80 टक्के तेल आयात करतो. ज्यामध्ये रशिया, सौदी अरेबिया, इराक( Iraq ), अमेरिका अशा देशांचा समावेश आहे. मागच्या वर्षी असे आठ देश असे होते ज्या देशांकडून भारताने रशियापेक्षा जास्त तेल आयात केले होते.

दरम्यान, अमेरिका( USA ) आणि सौदी अरेबियानंतर रशिया( Russia ) असा देश आहे जो कच्च्या तेलाचा सर्वात मोठा उत्पादक आहे. रशियातून दररोज 50 लाख बॅरल कच्च्या तेलाची निर्यात केली जाते. 50 टक्केपेक्षा जास्त हिस्सा युरोपला निर्यात केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT