Afghanistan: अफगाणच्या माजी खासदाराची गोळी मारुन हत्या

Afghanistan: दरदिवशी अफगाणिस्तानमध्ये नवीन बदल होत असतात. तालिबानने राजकीय सत्तेला पायउतार करत आपली सत्ता स्थापन केली होती.
Afghanistan
AfghanistanDainik Gomantak

Afghanistan: तालीबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून अफगाणिस्तानचा चेहरामोहराच बदलला आहे. दरदिवशी अफगाणिस्तानमध्ये नवीन बदल होत असतात. तालिबानने राजकीय सत्तेला पायउतार करत आपली सत्ता स्थापन केली होती.

आता अफगाणिस्तानमध्ये तत्कालिन सांसद असलेल्या मुर्सल नबीजादा आणि त्यांच्या बॉडीगार्डची गोळी मारुन हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, मुर्सल काबुल या आपल्या घरी होत्या. मारेकऱ्यांनी रात्री त्यांना आणि त्यांच्या बॉडीगार्डला गोळ्या घालत हत्या केली आहे. या हल्ल्यात मुर्सल नबीजादांचा भाऊसुद्धा घायाळ झाला आहे. सुरक्षाबलांकडून याचा तपास सुरु केला आहे.

मुर्सल नबीजादा त्या नेत्यांपैकी एक आहे जी तालीबानच्या सत्तेच्या स्थापनेनंतर देश सोडून पळून गेल्या नाहीत.अफगाणिस्तानच्या पूर्व सांसद मरियम सोलेमानखिल ने ट्विटरवर मुर्सल नबीजादा यांच्याबद्दल लिहले आहे. नबीजादा अफगानिस्तान की निडर चॅपियन होत्या. त्या एक कणखर आणि धाडसी महिल्या होत्या. ज्या संकटांना बघून कधीही मागे फिरल्या नाहीत.

Afghanistan
Nepal Plane Crash: नेपाळमध्ये अपघात झालेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला, अपघाताचे कारण समजण्याची शक्यता

तालिबानची सत्ता अफगाणिस्तान( Afganistan )मध्ये स्थापन झाल्यानंतर त्यांच्याकडे अफगाणिस्तान सोडून जाण्याचा मार्ग उपलब्ध होता. मात्र त्यांनी जनतेच्या हितासाठी लढण्याचे ठरवले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच तालीबान( Taliban )ने महिलांच्या शिक्षणावर बंदी घातली होती. तालीबानच्या या जाचक नियमांमुळे सध्या जगभरातून तालीबानवर टीका करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com