Maldivian President Mohamed Muizzu  Dainik Gomantak
ग्लोबल

Maldives President Mohamed Muizzu: ''भारताची माफी मागा नाही तर...''; जम्हूरी पक्षाच्या नेत्याचा राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंना घरचा आहेर!

India-Maldives Relations: मालदीव सरकारमधील मंत्र्यांनी पीएम मोदींविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करण्यास सुरुवात केली होती.

Manish Jadhav

India-Maldives Relations: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपशी संबंधित सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यामधून त्यांनी भारतीय नागरिकांना लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले होते. परंतु शेजारील देश मालदीवमध्ये हा मेसेज चांगला गेला नाही. त्यानंतर मालदीव सरकारमधील मंत्र्यांनी पीएम मोदींविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करण्यास सुरुवात केली होती. मात्र, दोन्ही देशातील तणाव वाढल्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांना आपल्या आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकाव्या लागल्या. दरम्यान, मंगळवारी मालदीवस्थित जम्हूरी पक्षाचे नेते गासुइम इब्राहिम यांनी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना त्यांच्या सततच्या भारतविरोधी वक्तव्यांमुळे भारत आणि पंतप्रधान मोदी यांची माफी मागावी, असे आवाहन केले आहे. तसेच, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी म्हटले.

राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी भारताला धोका देणारा देश म्हटले होते

भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडल्यानंतर चीन समर्थित राष्ट्राध्यक्ष मुइज्जू हे भारताचे नाव न घेता सातत्याने वक्तव्ये करत आहेत. पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावरुन परतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी भारताला अप्रत्यक्षपणे धोका देणारा देश म्हणून संबोधले होते. मात्र आता, मुइज्जू यांना त्यांचे विरोधकच धडा शिकवण्याची तयारी करु लागले आहेत. मुख्य विरोधी पक्ष मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीने मोठी घोषणा केली. पार्टीने सोमवारी सांगितले की, ते मुइज्जू यांच्यावर महाभियोग चालवण्याची योजना आखत आहे. मुइज्जू यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा पराभव केला होता.

गासुइम यांनी माजी राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनाही घेरले

गासुइम यांनी त्या कथित टिप्पण्यांसाठी माजी राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांना जबाबदार धरले, ज्यामुळे सध्या मालदीव आणि भारतामधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. त्यांनी 'इंडिया आऊट' मोहीम सुरु केली होती. त्या काळात इब्राहिम सोलिह हे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष होते. चीनमधून परतल्यानंतर मुइज्जू यांनी वैद्यकीय सेवा आणि औषधांसह अनेक क्षेत्रात भारतावरील अवलंबित्व कमी करण्याचे आवाहान केले होते. Gasuim म्हणाले की, Muizzu यांनी भारतातून जेनेरिक औषधांची आयात कमी करुन युरोप, अमेरिकेचा पर्याय शोधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्याचबरोबर भारताने माफी मागितली नाही, तर मालदीववर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Violence: बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीना विरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार; भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी

कंडोमवरचा टॅक्स कमी करा; पाकिस्तानने IMF समोर पुन्हा पसरले हात, पदरी पडली निराशा

Bharat Taxi: रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि सुरक्षित प्रवास; केंद्र सरकार लाँच करणार 'भारत टॅक्सी' अ‍ॅप, ओला-उबरला टक्कर

Bangladesh Violence: बांगलादेशात माणुसकीला काळिमा! हिंदू तरुणाची निर्घृण हत्या, मृतदेह झाडाला टांगून जाळला Watch Video

Margao: मडगावात पादचारी पूल बंद! टॅक्सीचालक, दुकानदारांमध्ये नाराजी; साबांखा मंत्र्यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT