India is doing injustice to the people of Jammu- Kashmir Pakistan President Arif Alvi Dainik Gomantak
ग्लोबल

भारत काश्मीरमधील लोकांवर अन्याय करतोय; पाकिस्तानी राष्ट्रपतींचा आरोप

पाकिस्तानचे राष्ट्रपती (Pakistan President) आरिफ अल्वी (Arif Alvi) यांनी आरोप केला की, भारत (India) चीनशी (China) असलेले त्यांचे संबंध खराब करण्याचा प्रयत्न करत आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचे राष्ट्रपती (Pakistan President) आरिफ अल्वी (Arif Alvi) यांनी आरोप केला की, भारत (India) चीनशी (China) असलेले त्यांचे संबंध खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. अल्वी म्हणाले, पाकिस्तानला नेहमीच आपल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध हवे असतात. पण भारताने पाकिस्तनची ही इच्छा दुर्बलता म्हणून घेतली आहे. राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी हे विधान विधानसभेच्या चौथ्या संसदीय वर्षाच्या सुरुवातीच्या निमित्ताने, द्विसदनीय संसदेचे कनिष्ठ सभागृहात केले आहे. (India is doing injustice to the people of Jammu- Kashmir Pakistan President Arif Alvi)

पाकिस्तानमधील दहशतवादी तळावर भारतीय हवाई दलाच्या हवाई हल्ल्याची आठवण करून देताना अल्वी म्हणाले, पाकिस्तानला नेहमीच आपल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध हवे असतात. पण भारताने तो आपला एक कमकुवतपणा मानला आहे . 26 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानच्या सीमेत प्रवेश केला आणि बालाकोटमधील जैशच्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला होता.

तत्पूवी भारताने पाकिस्तानला कळवले आहे की त्याला दहशतवाद, शत्रुत्व आणि हिंसामुक्त वातावरणात इस्लामाबादसोबत सामान्य शेजारी संबंध हवे आहेत. भारताने हा संदेश अनेक वेळा दिला आहे की दहशतवादापासून मुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे.

अलवींचा काश्मिरी राग

भारत काश्मीरमधील लोकांवर अन्याय करत असल्याचा आरोप अल्वी यांनी केला असून ते म्हणाले, मला भारताला भारतातील अत्याचार थांबवायला सांगायचे आहे आणि काश्मीरमध्ये स्वयंनिर्णयाचे वचन पूर्ण करायचे आहे. अल्वी म्हणाले, पाकिस्तानला अफगाणिस्तानात शांतता हवी आहे आणि पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये एक महत्वाची सकारात्मक भूमिका बजावत आहे.

भारत पाक-चीन संबंध बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे

पाकिस्तानच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल अल्वी यांनी चीनचे कौतुकही केले. ते म्हणाले, "चीन-पाकिस्तान संबंध बिघडवण्याचे भारताचे प्रयत्न असूनही, इस्लामाबादने बीजिंगशी असलेल्या संबंधांना अत्यंत आदराने वागवले." ते म्हणाले, "आम्ही चीनशी असलेल्या संबंधांकडे मोठ्या आदराने पाहतो आणि त्यांना मजबूत करू इच्छितो." मला भारताला हे स्पष्टपणे सांगायचे आहे की ते आपल्या ध्येयांमध्ये कधीही यशस्वी होणार नाही आणि पाक-चीन मैत्री अधिक मजबूत होत राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT