Ukrainian city Dainik Gomantak
ग्लोबल

तात्काळ खार्किव शहर सोडा, भारत सरकारने भारतीयांना केलं आवाहन

यातच आता भारताने सर्व भारतीयांना युक्रेनचे (Ukraine) खार्किव शहर सोडण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये रशियाचे हल्ले सातत्याने वाढत आहेत. युक्रेनमध्ये जोरदार गोळीबार होत असताना, भारताने सर्व भारतीयांना या देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असणाऱ्या खार्किवमधून (Kharkiv) ताबडतोब निघून जाण्यास सांगितले आहे. (India has asked all Indians to leave the Ukrainian city of Kharkiv)

दरम्यान, युक्रेनमधील (Ukraine) भारतीय दूतावासाने ट्विट करत म्हटले, 'खार्किवमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीयांना महत्त्वाचा सल्ला... तुमच्या सुरक्षेसाठी खार्किवमधून तात्काळ निघून जा. Pesochin, Babaye आणि Bezlyudovka ला शक्य तितक्या लवकर जा, कोणत्याही परिस्थितीत त्यांनी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इथे पोहोचले पाहिजे.

तसेच, रशियन हल्ल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे. अशा परिस्थितीत तिथे अडकलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी भारताच्या बाजूने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज सांगितले की, भारताने गेल्या 24 तासांत युद्धग्रस्त युक्रेनमधून 1,377 नागरिकांना बाहेर काढले आहे. सोशल मीडियावर माहिती देताना परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केले की, 'गेल्या 24 तासांत पोलंडहून आलेल्या पहिल्या विमानासह सहा उड्डाणे भारतासाठी रवाना झाली आहेत. युक्रेनमधून आणखी 1377 भारतीय नागरिकांना परत आणण्यात आले आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Diversions: ‘आयर्नमन 70.3’ मुळे गोव्यात वाहतूक मार्गात बदल! पर्यायी रस्ते कोणते? जाणून घ्या..

Kala Academy: 'कला अकादमीच्या दुरुस्तीचे लेखापरीक्षण, चौकशी करा'! कला राखण मांडची मागणी; सचिवांशी विविध विषयांवर चर्चा

Goa Crime: 4 नाही 13 कोटींचा घोटाळा! गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गुजरातपर्यंत पसरले जाळे; जालन्यातून एकाला अटक

Lotulim Land Scam: लोटलीत जमीन विक्री घोटाळा उघड! राजकारण्याची गुंतवणूक असल्याचे उघड; संशयित ज्येष्ठ महिलेवर गुन्हा

Ranji Trophy 2025: गोव्याशी भिडणार RCBचा कॅप्टन! रणजी करंडकमध्ये रंगणार थरार; 15 वर्षांनंतर चुरशीची लढत

SCROLL FOR NEXT