Russia Ukraine War: भारतीय विद्यार्थ्याने गमावला जीव

एकूण दोन विद्यार्थी धोक्याच्या छायेत : पालकांची भीतीने बोबडी वळली
War
War Dainik Gomantak
Published on
Updated on

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: रशियन सैन्याने केलेल्या गोळीबारात काल खार्किव्ह या शहरात एका भारतीय विद्यार्थ्याचा बळी गेला. त्याच शहरात दक्षिण गोव्यातील वास्को येथील मुस्कान नावाची एक विद्यार्थिनी अडकून पडली असून तिलाही आपल्या अन्य भारतीय मैत्रिणी बरोबर हॉस्टेल खाली असलेल्या बंकरचा आसरा घेण्याची पाळी आली आहे.

War
गोव्यातील एसीजीएल कंपनीचा पगारवाढ प्रश्न मिटला

रशियाने (Russia) केलेल्या आक्रमणात युक्रेन बॉम्ब वर्षावात भाजून निघत असताना तिथे असलेले गोमंतकीय विद्यार्थी सुखरूप असल्याचे प्रशासनाकडून भासविले जात असले तरी गोव्यातील दोन विद्यार्थी धोक्याच्या ठिकाणी अडकून पडले असून ते दोघेही दक्षिण गोव्यातीलच आहेत.

खार्किव्ह येथे अडकून पडलेल्या त्या विद्यार्थीनीने आपल्या सुमारे 144 भारतीय मैत्रीणी बरोबर आपल्या हॉस्टेल खालील बंकरमध्ये आसरा घेतल्याची माहिती मिळाली आहे. ही विद्यार्थीनीही आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी युक्रेनमध्ये गेली होती. बाणावली येथील जेडन परेरा हा आणखी एक 19 वर्षीय विद्यार्थी समी या शहरात असाच अडकून पडला असून आपल्या सुमारे 500 भारतीय वर्ग मित्रांबरोबर त्यांच्याही नशिबी बंकरचा आसरा घेणे नशिबी आले आहे. काल ही बातमी 'गोमंतक'ने प्रसिद्ध केली आहे.

War
चोरीच्या 106 मोबाईलसह, तरुणीला पणजी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

या दोन्ही विद्यार्थ्यांच्या आम्ही संपर्कात आहोत. पण या दोन्ही भागात युध्द (War) भडकले असून त्यांना अशा परिस्थितीत बाहेर काढणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे युक्रेन मधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी आहे त्या स्थितीतच आणखी काही काळ कळ काढावी असा सल्ला दिला आहे अशी माहिती एनआरआय खात्याचे संचालक अँथनी डिसोझा यांनी दिली.

या युद्धात एका भारतीय विद्यार्थ्याचे निधन झाल्याचे वृत्त मिळाल्यावर सध्या युध्दग्रस्त भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे तोंडचे पाणी पळाले आहे.

जेडन परेरा याची आई अनिता परेरा हिची आज भेट घेतली असता आमचा मुलगा सुखरुप गोव्यात (Goa) येवो यासाठी आम्ही सतत देवाची प्रार्थना करत आहोत. इंटरनेटच्या माध्यमातून आम्ही त्याच्या संपर्कात असलो तरी त्याची आम्हाला काळजी वाटते. भारत सरकारचे त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू असले तरी बाहेर सगळीकडे बॉम्ब वर्षाव चालू असताना त्यांना बाहेर कसे काढावे हाही एक गहन प्रश्न बनला आहे असे त्या म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com