UN Parvathaneni Harish Dainik Gomantak
ग्लोबल

'आर्मीकडून 4 लाख महिलांवर सामूहिक लैंगिक अत्याचार, ऑपरेशन सर्चलाईटमध्ये नरसंहार'; भारतानं युएनमध्ये उघडे पाडले पाकिस्तानचे क्रौर्य

India exposes Pakistan UN: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील चर्चेत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा मुखवटा फाडला आहे.

Sameer Amunekar

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील चर्चेत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा मुखवटा फाडला आहे. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वथनेनी हरीश यांनी पाकिस्तानमधील महिलांवरील अत्याचार, तसेच 1971 मधील ऑपरेशन सर्चलाइटचा संदर्भ देत, पाकिस्तानला कठोर शब्दांत सुनावले. त्यांनी म्हटले की, “जो देश स्वतःच्या नागरिकांवर बॉम्बस्फोट करतो, पद्धतशीर नरसंहार करतो आणि लाखो महिलांवर बलात्कार करतो, तो जगाला शांततेचा धडा देऊ शकत नाही.”

पाकिस्तानचा दुटप्पीपणा जगासमोर

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या महिला, शांतता आणि सुरक्षितता या विषयावरील विशेष चर्चेदरम्यान बोलताना, हरीश यांनी भारताविरुद्ध विशेषतः जम्मू-काश्मीरबाबत पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या “भ्रामक टीका”वर जोरदार प्रत्युत्तर दिले.

हरीश म्हणाले, "दरवर्षी, दुर्दैवाने आम्हाला पाकिस्तानकडून भारताविरुद्धच्या आणि विशेषतः जम्मू-काश्मीरबाबतच्या असत्य व भ्रामक विधानांचा सामना करावा लागतो. हा तोच देश आहे ज्याने आपल्या लोकांवर बॉम्बफेक केली, नरसंहार केला आणि महिलांवर अत्याचार केले."

1971 मधील ‘ऑपरेशन सर्चलाइट’चा उल्लेख

हरीश यांनी आपल्या भाषणात 1971 मधील ऑपरेशन सर्चलाइटचा उल्लेख करत पाकिस्तानच्या भीषण कृत्यांची आठवण करून दिली. ते म्हणाले, “हा तोच देश आहे ज्याने 1971 मध्ये ऑपरेशन सर्चलाइट राबवले आणि सुमारे 4 लाख महिलांवर सामूहिक बलात्कार करून नरसंहार केला. अशा देशाने जगासमोर शांततेची भाषा बोलणे हे अत्यंत ढोंगीपणाचे उदाहरण आहे.”

हरीश यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तान अतिरेकी प्रचार आणि दिशाभूल करून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष खऱ्या मुद्द्यांपासून हटवतो. “पाकिस्तानला माहीत आहे की त्याची प्रतिमा जगभर ढासळली आहे. म्हणून ते अतिरेकी प्रचाराद्वारे भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. पण जग आता त्यांच्या या खेळीला ओळखू लागले आहे." पाकिस्तानसारख्या दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या देशांकडून अशा विषयांवर नैतिक भाषण ऐकणे योग्य नाही.

यापूर्वी सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्र महासभेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही पाकिस्तानचा अप्रत्यक्ष उल्लेख करत कठोर शब्दांत टीका केली होती. त्यांनी म्हटले होते, "जे देश दहशतवादाला राज्य धोरण म्हणून स्वीकारतात आणि दहशतवाद्यांचा गौरव करतात, त्यांना शेवटी त्याचाच फटका बसतो."

भारताने संयुक्त राष्ट्र मंचावरून पाकिस्तानच्या दुहेरी धोरणावर पुन्हा प्रकाश टाकला आहे. हरीश यांच्या भाषणाने पाकिस्तानच्या महिलांवरील अत्याचारांचा आणि 1971 च्या नरसंहाराचा भयानक इतिहास जगासमोर आणला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Formula 4 Racing In Goa: गोव्यात होणार प्रतिष्ठीत 'फॉर्म्युला- 4 रेस'; गोमंतकीयांना अनुभवता येणार जागतिक रेसिंग स्पर्धेचा थरार

टीसींना 'बॉडी कॅमेऱ्यांचे' कवच! खोट्या विनयभंगाचे आरोप रोखण्यासाठी होतेय मागणी, तिकीट नसताना टीसीशी हुज्जत घालणाऱ्या महिलेचा Video Viral

Goa Congress: 'भाजप का काँग्रेसविरोधात लढायचंय ठरवा'; भूमिका स्पष्ट करण्याचा माणिकराव ठाकरेंचा 'आप'ला सल्ला

Vaibhav Suryavanshi: LIVE सामन्यात वाद! आऊट दिल्यावर 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी अंपायरवर भडकला; पुढे काय झालं, पाहा VIDEO

Mohammed Siraj: "जा, रिक्षा चालव!", एका अपयशाने 'हिरो' ते 'झीरो'? मोहम्मद सिराजने नेटिझन्सच्या दुटप्पी भूमिकेवर सोडले मौन, म्हणाला...

SCROLL FOR NEXT