Volodymyr Zelenskyy Dainik Gomantak
ग्लोबल

Russia: 'रशियाकडून भारत आमचं रक्त विकत घेतोय', युक्रेनियन परराष्ट्रमंत्र्यांची टीका

Russia Ukraine War: रशियाकडून तेल खरेदी करण्यावरुन युक्रेनने भारतावर टीका केली आहे.

दैनिक गोमन्तक

Russia Ukraine War: रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल युक्रेनने आपला राग भारतावर काढला आहे. रशियाकडून कच्चे तेल विकत घेऊन भारत युक्रेनचे रक्त विकत घेत असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला केला होता. त्यानंतर अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियावर कडक निर्बंध लादले. मात्र पाश्चात्य देशांच्या टीकेनंतरही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली. युक्रेन युद्धानंतर भारताने तेलाची आयात अधिक पटीने वाढवली आहे. त्याचबरोबर भारताने रशियाशी व्यापारही सुरु ठेवला आहे.

दरम्यान, या मुद्द्यावर युक्रेनचे (Ukraine) परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी बुधवारी सांगितले की, युक्रेनला भारताकडून (India) "अधिक व्यावहारिक समर्थन" अपेक्षित आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना कुलेबा म्हणाले, 'युक्रेन हा भारताचा विश्वासार्ह भागीदार आहे, परंतु रशियाकडून (Russia) कच्चे तेल खरेदी करुन भारत प्रत्यक्षात युक्रेनचे रक्त विकत घेत आहे.'

युक्रेनचे परराष्ट्र मंत्री पुढे म्हणाले, “जेव्हा भारत रशियाकडून कच्चे तेल सवलतीच्या दरात विकत घेतो, तेव्हा हे समजून घेतले पाहिजे की, ही सवलत इतर ठिकाणाहून नाही तर युक्रेनच्या रक्ताने भरुन काढली जाते. भारताला पुरवल्या जाणाऱ्या रशियन कच्च्या तेलाच्या प्रत्येक बॅरलमध्ये युक्रेनचे रक्त आढळते. आम्ही भारताशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आहेत. आम्ही भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे समर्थन केले होते. भारताकडून युक्रेनला अधिक व्यावहारिक मदतीची अपेक्षा आहे.” ते पुढे असेही म्हणाले की, ''भारत आणि युक्रेनमधील लोकशाही सरकारचे आम्ही समर्थन करतो, ज्यामध्ये समानता आहे. दोन्ही लोकशाही देशांनी एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Unity Mall: 'चिंबल' ग्रामस्थांचे मोठे यश! युनिटी मॉल बांधकाम परवान्याला दिले आव्हान; सरकारी पक्षाचा विरोध फेटाळला

Goa Electricity Department : गोवा वीज खात्याला 182 कोटींचा तोटा! 2558 कोटी खरेदी खर्च; फरकाची रक्कम राज्य सरकार भरणार

Pilgao: 'आता शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत'! पिळगाववासीय उतरले रस्त्यावर; खनिज वाहतूक अडवली; प्रलंबित प्रश्‍न सोडवण्याची केली मागणी

Goa Politics: खरी कुजबुज; अबब! 50 कोटींचा खर्च वायफळ

New Borim Bridge: नवीन बोरी पुलासाठी 1000 कोटींचा आराखडा! अडीच वर्षांत काम होणार पूर्ण; ढवळीतून निघणार बगलरस्ता

SCROLL FOR NEXT