Donald Trump, Narendra Modi Dainik Gomantak
ग्लोबल

India America Relations: ट्रम्प यांनी 4 वेळा फोन केला, पण मोदींनी घेतला नाही? जर्मन मासिकाचा मोठा दावा

Donald Trump Narendra Modi Phone Call: भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार आणि टॅरिफवरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका जर्मन वृत्तपत्राने एक मोठा दावा केला आहे.

Manish Jadhav

Donald Trump Narendra Modi Phone Call: भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार आणि टॅरिफवरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका जर्मन मासिकाने एक मोठा दावा केला आहे. या दाव्यानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळा कॉल केला, पण मोदींनी त्यांचे कॉल घेतले नाहीत. जर्मनीतील एका प्रतिष्ठित मासिकाने हा दावा केल्यामुळे दोन्ही नेत्यांमधील संबंधांबद्दल जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यावर अद्याप भारत किंवा अमेरिकेच्या सरकारने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर फोनची चर्चा

जर्मनीतील 'एफएझेड' (FAZ) नावाच्या एका मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही देशांमध्ये टॅरिफवरुन वाद सुरु असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, चार वेळा प्रयत्न करुनही मोदींनी ट्रम्प यांच्याशी बोलणे टाळले. ही बातमी जर खरी असेल, तर ट्रम्प यांच्या दबावापुढे न झुकणारे मोदी हे जगातले एकमेव नेते ठरतील, असेही या मासिकाने म्हटले आहे.

गेल्या महिन्याभरापासून दोन्ही देशातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये आल्यापासून दोन्ही देशांमध्ये काही मुद्द्यांवरुन मतभेद निर्माण झाले आहेत. ट्रम्प प्रशासनाने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावर पहिल्यांदा 25 टक्के टॅरिफ लावला. एवढ्यावरच न थांबता ट्रम्प प्रशासनाने पुन्हा अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला. यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये दुरावा आल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, भारताकडून सध्या ट्रम्प प्रशासनासोबत टॅरिफच्या मुद्द्यावर चर्चा सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

जेडी वॅन्सचाही फोन घेतला नव्हता

ही पहिलीच वेळ नाही जेव्हा मोदींनी एखाद्या मोठ्या अमेरिकन नेत्याचा फोन घेतला नाही. पाकिस्तानसोबतच्या संघर्षादरम्यान घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदींनी लोकसभेत सांगितले होते की, ''युद्धबंदीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 9 मेच्या रात्री अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी माझ्याशी 3-4 वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यावेळी सशस्त्र दलांसोबतच्या बैठकांमध्ये व्यस्त होतो."

मोदींनी पुढे सांगितले की, "जेव्हा मी त्यांना पुन्हा फोन केला, तेव्हा त्यांनी मला पाकिस्तानकडून एका मोठ्या हल्ल्याची शक्यता वर्तवत सावध केले. त्यावर मी त्यांना म्हटले की, जर पाकिस्तानने भारतावर हल्ला केला, तर आमचा हल्ला त्यापेक्षा कित्येक पटींनी मोठा असेल." मोदींच्या या वक्तव्यावरुन त्यांची कणखर भूमिका स्पष्ट झाली होती.

भारत-अमेरिका संबंध आणि भविष्यातील दिशा

गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि अमेरिका यांच्यात चांगले संबंध राहिले आहेत. पण, डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी 'अमेरिका फर्स्ट' या धोरणाला प्राधान्य दिले. त्यामुळे भारतासारख्या देशांवर व्यापार आणि इतर मुद्द्यांवर दबाव वाढत असल्याचे दिसत आहे. या वादामुळे दोन्ही देशांतील संबंधांवर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो. सध्या भारतीय शिष्टमंडळ अमेरिकेशी चर्चा करत असले तरी या प्रकरणावर तोडगा काढणे सोपे नाही. दोन्ही देशांना आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करायचे आहे, ज्यामुळे हा वाद लवकर संपण्याची शक्यता कमी आहे.

दुसरीकडे, जर्मन मासिकाने केलेल्या या दाव्यावर दोन्ही देशांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी, या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मोदींच्या या भूमिकेने भारताची कणखर प्रतिमा पुन्हा एकदा जगासमोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT