India Independence Day| Google Doodle Dainik Gomantak
ग्लोबल

India Independence Day: गुगलने भारताची संस्कृती दाखवत बनवले खास Doodle!

दैनिक गोमन्तक

भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्वातंत्र्याचा (Independence Day 2022) अमृत महोत्सव साजरा केला जात आहे, गुगलनेही (Google) हा दिवस खास पद्धतीने साजरा केला आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलने अनोखे डूडल (Doodle) बनवले आहे. यामध्ये रंगीबेरंगी पतंग उडवताना दाखवण्यात आले आहेत. हे पतंग भारताने आतापर्यंत मिळवलेल्या यशाच्या उंचीचे प्रतीक दर्शवित आहेत.

भारतायच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त Google ने म्हटले आहे की, 1947 या दिवशी मध्य रात्री भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र भारतासाठी सुरु असलेले आंदोलन समाप्त झाले. या आंदोलनाचा शेवट गोड झाला.

गुगलने एक GIF तयार केले
केरळची कलाकार नीतीने हे डूडल तयार केले आहे. यामध्ये 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरे करताना दाखवण्यात आले आहे. या खास प्रसंगी गुगलने एक GIF तयार केले आहे. स्वातंत्र्य दिन 2022 च्या डूडलमध्ये पतंगांच्या माध्यमातून भारताच्या संस्कृतीचे चित्रण करण्यात आले आहे.

पतंग उडवणे जुनी परंपरा

डूडलबद्दल तिचे विचार शेअर करताना, कलाकार नीती म्हणाली की, पतंग उडवणे ही एक जुनी परंपरा आहे. ही परंपरा देखील भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाचा अविभाज्य भाग आहे. नीती म्हणाली की, स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्यसैनिक ब्रिटीश राजवटीविरुद्ध घोषणा लिहिण्यासाठी पतंगाचा वापर केला जात असे. निषेधाचे चिन्ह म्हणून ते आकाशात उडवले जात असे.

Google ने बनवला 2 मिनिटांचा व्हिडिओ

गुगलने 2 मिनिटांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचा 75 वर्षांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला गेल्या 75 वर्षांचा भारतीय इतिहास केवळ 2 मिनिटांत दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT