Ukraine Russia war Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये उणे 20 अंश तापमानात 30 लाख लोकांवर घर सोडायची वेळ

रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे वीजकेंद्रे उद्धवस्त, 1 कोटीहून अधिक लोक जगताहेत अंधारात

Akshay Nirmale

Russia-Ukraine War: युक्रेनमधील लोकांना सध्या युद्धासह कडाक्याच्या थंडीलाही तोंड द्यावे लागत आहे. रशिया-युक्रेन युद्धाला या महिन्यात ९ महिने पुर्ण होतील. युद्ध कधी संपणार हे कोणच सांगू शकत नाहीय. त्यातच रशियाने युक्रेनमधील वीज केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. 1 कोटीहुन अधिक लोकांना अंधारात जीवन व्यतीत करावे लागत असल्याने जवळपास 30 लाख लोकांनी उणे 20 अंश तापमानात घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने युक्रेनमधील स्थितीवरून एक चिंता व्यक्त केली आहे. त्यात उर्जा संकटाचा सामना करत असलेल्या युक्रेनमध्ये थंडीमुळे लाखो लोकांचा जीव जाऊ शकतो, असे डब्ल्यू एचओने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रशियाने युक्रेनमधील वीज केंद्रांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे येथील घरांमध्ये वीज नाही. याशिवाय वीज संसाधने आणि इतर उर्जा उपकरणांचे मोठे नुकसान युक्रेनमध्ये झाले आहे. या साधनांनी युक्रेनमध्ये कमतरता दिसून येत आहे.

डब्ल्यूएचओचे प्रादेशिक संचासलक हॅन्स हेन्री क्लयूग म्हणाले की, युक्रेनच्या अर्ध्याहून अधिक उर्जा केंद्रांचे नुकसान झाले आहे. तर काही पुर्णतः उद्धवस्त झाले आहेत. त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. सध्या एक कोटी लोक विजेशिवाय जगत आहेत. तर 30 लाख लोक थंडीपासून बचावासाठी घर सोडण्याच्या तयारीत आहेत. युक्रेनमधील थंडी जीवघेणी ठरू शकते. सध्या येथील तापमान उणे 20 अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता आहे.

रशिया-युक्रेनमधील तणाव सध्या सर्वोच्च पातळीवर आहे. लोक वीज नसल्याने वैतागले आहेत. याशिवाय थंडीमुळे अनेक प्रकारच्या संसर्गाचाही धोका आहे. रूग्णालयांच्या कमतरतेमुळे येथे थोडा संसर्गही मोठी उलथापालथ माजवू शकतो. कोरोनामुळे निमोनिया, श्वासोच्छवासाशी निगडीत आजारही गंभीर रूप घेऊ शकतात. रशियाने युक्रेनमधील 100 हून अधिक आरोग्य केंद्रे उद्धवस्त केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics : ''डबल इंजिन'चे आश्वासन Fail!आता जनताच भाजपला धडा शिकवेल; माणिकराव ठाकरे-अमित पाटकरांचा घणाघात

IPL 2026 Auction: गोव्याचे क्रिकेटपटू 'आयपीएल' लिलावात पसंतीविना; सुयश प्रभुदेसाई, अभिनव तेजराणा व आणि ललित यादव Unsold

Drishti Marine: समुद्रात बुडणाऱ्या चौघांना जीवरक्षकांकडून जीवदान, दृष्टी मरीनची कामगिरी; दोन बेपत्ता मुलांना काढले शोधून

Goa News Live: वाळपईत एका 41 वर्षीय महिलेचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

Goa Agriculture: आंबा मोहरला, समाधानकारक पीक शक्य; थंडीचा परिणाम, काणकोणात काजू बोंडू धरण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT