Marriage Dainik Gomantak
ग्लोबल

'या' देशात महिलेला एकाहून अधिक पती असतील तर हरकत नसणार; कायद्यावरुन वादंग

महिलांना (Women) एकाहून अधिक पुरुषांशी लग्न करण्याचा आणि त्यांना पती म्हणून मान्यता देण्यासंदर्भात दक्षिण आफ्रिकेमध्ये (South Africa) कायदा समंत करण्यावरुन वाद निर्माण झाला आहे.

दैनिक गोमन्तक

महिलांना एकाहून अधिक पुरुषांशी लग्न करण्याचा आणि त्यांना पती म्हणून मान्यता देण्यासंदर्भात दक्षिण आफ्रिकेमध्ये (South Africa) कायदा समंत करण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. जुन्या विचारसरणीचा प्रभाव असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेसारख्या देशामध्ये कायदा संमत केला जाण्याची शक्यता असल्याने त्याला विरोध करण्यात येत आहे. देशातील गृह खात्याकडून (Home Department) या कायद्यासंदर्भातील (Law) एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

एकाहून अधिक पती असणाल्या कायदेशीर मान्यता देण्याचा दक्षिण आफ्रिकन सरकारचा (South African Government) विचार आहे. यासंदर्भातील प्रस्तव मांडण्यात आला असून या कायद्यावरुन देशात वादंग निर्माण झाला आहे. या प्रस्तावावर सरकारने 30 जूनपर्यंत नागरिकांची मते मागविली आहेत. हा प्रस्ताव सरकारकडून एप्रिलमध्ये मंजूर करण्यात आला. मंत्रालयाने मे महिन्यापासून त्यासंदर्भातील प्रस्ताव मागितले आहेत.

लग्नासंदर्भातील कायद्यांचा दक्षिण आफ्रिकेच्या संविधानामध्ये समावेश नसल्याचं सरकारने या प्रस्तावामध्ये म्हटलं आहे. आफ्रिकेत विवाहसंदर्भातील कायदे हे पंरपरेनुसार ठरवण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या लग्नासंदर्भात कायदा निर्माण करण्याच्या दृष्टीने सरकार विचार करत आहे. या नव्या कायद्यामुळे सर्वांनाचा लैंगिकता, धर्म, संस्कृती यासारख्या गोष्टींचा विचार करुन विवाह संस्थेला कायदेशीर आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आले आहेत. हा कायदा भेदभाव, समानता, मानवी मूल्य आणि विविधेत एकता यासारख्या गोष्टींवर आधारित असेल, असं सरकारने जाहीर केलेल्या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.

भरपूर चर्चा, अभ्यास आणि संशोधनानंतर संविधनातील तत्वांनुसार या कायद्यांच्या निर्मितीसाठी 2019 पासून काम सुरु करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. सांस्कृतिक, धार्मिक तसेच मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींसोबत बैठक घेऊन या कायद्यामध्ये इतर अनेक गोष्टींटा समावेश करण्यात आला आहे. मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुरुषांप्रमाणे महिलांनाही अनेक जोडीदार ठेवण्याचा हक्क हा समानतेच्या दृष्टीकोनामधून देण्यात आला पाहिजे अशी मागणी करत महिलांना अनेक विवाह कायदेशीर परवानगी देण्यात यावी असं म्हटल्याचं सरकारचे म्हणणे आहे.

आफ्रिकेतील प्रमुख विरोधी पक्षाने या कायद्याला विरोध केला आहे. दक्षिण आफ्रिकेचं संविधान हे जगामधील सगळ्यात उदारमतवादी संविधानापैकी एक आहे. मात्र यामध्ये पुरुषांइतकच महिलांना स्वातंत्र्य देण्यावरुन आता पुन्हा एकदा वाद सुरु झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT