Sri Lanka Dainik Gomantak
ग्लोबल

Sri Lanka: राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी 17 मंत्र्यांचे नवे मंत्रिमंडळ केले स्थापन

श्रीलंकेतील (Sri Lanka) प्रचंड विरोधानंतर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी सोमवारी 17 मंत्र्यांचे नवीन मंत्रिमंडळ स्थापन केले.

दैनिक गोमन्तक

श्रीलंकेतील (Sri Lanka) प्रचंड विरोधानंतर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी सोमवारी 17 मंत्र्यांचे नवीन मंत्रिमंडळ स्थापन केले. ज्यामध्ये त्यांचे भाऊ पंतप्रधान महिंदा राजपक्षे हे राजपक्षे कुटुंबातील एकमेव सदस्य आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, देशभरातील हजारो लोक आणीबाणी आणि कर्फ्यूचे (Curfew) उल्लंघन करुन सरकारचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले. त्यांनी पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) वगळता सर्व मंत्रिमंडळ सदस्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले होते. यानंतर अध्यक्षांना विरोधी सदस्यांना सोबत घेऊन सर्वसमावेशक मंत्रिमंडळ स्थापनेचा मार्ग मोकळा करणे भाग पडले. मात्र, विरोधकांनी ही ऑफर फेटाळून लावली.

दरम्यान, श्रीलंकेतही (Sri Lanka) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोक सरकारवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत. काल रात्री नागरिकांनी राष्ट्रपती भवनावर "गो होम गोटा" म्हणजे "गोटा गो बॅक होम" लिहून लेझर प्रोजेक्ट केला. विशेष म्हणजे त्यांनी ट्विटरवरही ते शेअर केले. देशातील बिघडलेल्या परिस्थितीमुळे नाराज जनता श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.

दुसरीकडे मात्र, महिंदा राजपक्षे यांनी सोमवारी 17 सदस्यीय मंत्रिमंडळासह शपथ घेतली. यापूर्वी तीन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली होती. कुटुंबातील माजी सदस्य चमल राजपक्षे आणि महिंदा यांचा मुलगा नमल राजपक्षे यांना नवीन मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. हे दोघेही कॅबिनेट मंत्री होते तर शशिंद्र राजपक्षे राज्यमंत्री होते.

याशिवाय, 1948 मध्ये ब्रिटनपासून (Britain) स्वतंत्र झाल्यापासून श्रीलंका आजवरच्या सर्वात वाईट आर्थिक परिस्थितीतून जात आहे. आर्थिक संकटामुळे देशात राजकीय उलथापालथ होत आहे. त्यामुळे तासनतास वीजपुरवठा खंडित झाल्याने आणि इंधन, खाद्यपदार्थ, दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा अभावामुळे लोक रस्त्यावर उतरले. विशेष म्हणजे लोक राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करु लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'भाजपचं 13 वर्षांचं राजकारण म्हणजे भ्रष्टाचाराची गाथा!' गोव्यात दाखल होताच अरविंद केजरीवाल यांचा सावंत सरकारवर हल्लाबोल VIDEO

Goya Club Seal: परवानग्यांमध्ये घोळ, सुरक्षा नियमांची ऐशीतैशी, वागातोरमधील प्रसिद्ध 'गोया' क्लब सील; गोव्यातील नाईटलाइफला कडक संदेश

Crime News: एकाला फाशी, 9 जणांना जन्मठेप... हिंसाचार करुन हत्या करणाऱ्या नराधमांना कोर्टाचा दणका; काय आहे नेमकं प्रकरण?

VIDEO: भारतीय सागरी सीमेत घुसखोरीचा पाकिस्तानचा डाव उधळला, बोट जप्तीसह 11 खलाशी जेरबंद; तटरक्षक दलाची मोठी कारवाई!

Goa Nightclub Fire: 'तपास टाळण्यासाठी पळाले'! दिल्ली कोर्टात शाब्दिक लढाई; लुथरा बंधूंच्या जामिनाला गोवा पोलिसांचा तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT