Russia-Ukraine War News Updates Dainik Gomantak
ग्लोबल

Russia Ukraine War: 'शांतता' चर्चेसाठी युक्रेन तयार

आज चर्चा शक्य; पुतीनचा अणुयुद्धाचा इशारा

दैनिक गोमन्तक

किव्ह: युक्रेनवर रशियाने दबाव आणत त्याच देशात चर्चेसाठी येण्यास भाग पाडले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी अणुयुद्धाची शक्यता व्यक्त करताच बेलारुसमधील गोमेल भागात चर्चा करण्याची तयारी युक्रेनने दर्शविली. दुसरीकडे, अमेरिका आणि युरोपनेही रशियाला अद्दल घडविण्यासाठी रशियाच्या वित्त संस्थेवर कठोर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.

रशियाबरोबर शांतता चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, ही चर्चा बेलारुसमध्ये नको, अशी भूमिका युक्रेनने घेतली होती. त्याऐवजी वॉर्सा, ब्राटिस्लाव्हा, इस्तंबूल, बुडापेस्ट किंवा बाकू या इतर देशांमधील शहरांचा पर्यायही युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदोमिर झेलेन्स्की यांनी रशियाला दिला होता. मात्र, चर्चा बेलारुसमध्येच होईल, असे सांगून रशियाने आपले शिष्टमंडळही तिकडे पाठविले. ‘आम्ही चर्चेसाठी तयार असून बेलारुसमध्ये येऊन दाखलही झालो आहोत. (Russia-Ukraine War News Updates)

आता आम्ही युक्रेनच्या अधिकाऱ्यांची वाट पहातो आहोत,’ असे रशिया (Russia) सरकारचे प्रवक्ते दीमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले. मात्र, तरीही झेलेन्स्की यांनी नकार दिल्यावर रशियाने दबाव वाढविला होता. अखेर गोमेल भागात ही चर्चा करण्याची तयारी झेलेन्स्की यांनी दाखविली आहे. त्यांनी आज बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झांडर ल्युकाशेन्को यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत भूमिका कळविली.

रशियावर निर्बंध

रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय महासंघाने संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत रशियावरील नवे आर्थिक निर्बंध जारी केले. या युद्धासाठी रशियाला जबाबदार ठरवून, हे युद्ध रशियाला नुकसानकारक ठरविण्यासाठी हे निर्बंध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

‘स्विफ्ट’ म्हणजे काय?

‘स्विफ्ट’ ही वित्तीय संदेश पाठविण्यासाठीची यंत्रणा असून याद्वारे आंतरराष्ट्रीय व्यापारातील अनेक आर्थिक व्यवहार होतात. रशियाला मनाई केल्याने त्यांचे व्यवहार ठप्प होणार आहेत. मात्र, रशियाला बाहेर काढल्याने केवळ रशियालाच नाही, तर अमेरिका, जर्मनीच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

Vande Mataram 150th Anniversary: ‘विकसित भारत 2047 ’च्या स्वप्नासाठी जगा', CM सावंतांचे तरुणांना आवाहन; ‘वंदे मातरम्’ स्मरणोत्सव साजरा

Goa Today's News Live: 'पाकिस्तान झिंदाबाद' फलक प्रकरणी बजरंग दल आक्रमक; तक्रार दाखल

'गोवा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान, नागरिकांसाठी मात्र असुरक्षित', LOP युरींचे टीकास्त्र; कायदा व सुव्यवस्था विषयावर अधिवेशन बोलवण्याची मागणी

Goa ZP Election: आरक्षित मतदारसंघांची यादी जाहीर! कवळेकर समर्थकांना धक्‍का, काब्राल समर्थकाला दिलासा; फोंड्यात महिलाराज

SCROLL FOR NEXT