Train Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानात 'नापाक कृत्य', चालत्या ट्रेनमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

रेल्वे (Train) कर्मचाऱ्यांनीच एका महिलेसोबत चालत्या ट्रेनमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानातील कराची येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे रेल्वे कर्मचाऱ्यांनीच एका महिलेसोबत चालत्या ट्रेनमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. बहाउद्दीन झकेरिया एक्स्प्रेसमध्ये दोन तिकीट चेकर आणि त्यांच्या प्रभारींनी कराचीतील एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. (In Pakistan a woman was gang-raped by train staff on a train)

दरम्यान, महिलेच्या तक्रारीवरुन कराची शहर पोलीस (Police) ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, ही घटना 27 मे रोजी घडली, जेव्हा कराचीमधील ओरंगी टाऊनमधील रहिवासी पीडित महिला मुलतान रेल्वे स्टेशनवरुन कराचीला (Karachi) जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढली होती. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, महिला (Women) आपल्या मुलांना भेटण्यासाठी मुझफ्फरगडमधील तिच्या सासरच्या घरी जात होती.

पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, एफआयआरमध्ये नोंदवण्यात आले आहे की, महिला प्रवाशाने कराचीसाठी इकॉनॉमी क्लासचे तिकीट खरेदी केले आणि बहाउद्दीन झकेरिया एक्स्प्रेस जेव्हा रोहरी स्थानकावर पोहोचली तेव्हा दोन तिकीट चेकर आणि त्यांच्या प्रभारींनी तिला एसी बोगीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

दुसरीकडे, तिकीट चेकर जाहिद आणि त्याचा प्रभारी आकिब यांनी पीडितेला एका कोचच्या एसी डब्यात नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तेथून पळ काढला. कराची रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर महिलेने घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

प्रकरणाची नोंद झाल्यानंतर, फेडरल रेल्वे मंत्री साद रफिक यांनी या घटनेची दखल घेतली आणि पोलिस महानिरीक्षक (IGP) रेल्वेकडून 24 तासांत अहवाल मागवला. दरम्यान, डीएस रेल्वे हमाद हसन मिर्झा यांनी दावा केला आहे की, पोलिसांनी कराचीतील महिलेच्या सामूहिक बलात्कारात सहभागी असलेल्या दोन संशयितांना अटक केली आहे.

"सामूहिक बलात्कार प्रकरणात नाव असलेले संशयित बहाउद्दीन झकेरिया एक्स्प्रेस चालवणाऱ्या खाजगी कंपनीचे कर्मचारी होते," असे त्यांनी माध्यमांना सांगितले. ते म्हणाले की, ते पाकिस्तानी रेल्वेचे कर्मचारी नाहीत. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT