Japan ban Upskirting Dainik Gomantak
ग्लोबल

Japan ban Upskirting: जपानमध्ये स्कर्टमधील महिलेचे फोटो काढाल तर मानला जाईल बलात्कार; काय आहे प्रकरण घ्या जाणून...

तीन वर्षांच्या तुरूंगवासासह दंडाची शिक्षा; अपस्कर्टिंगविरोधात अनेक देशांत कायदे

गोमंतक ऑनलाईन टीम

Japan ban Upskirting: जपानमधील महिलांच्या सुरक्षेसाठी संसदेत नवे विधेयक मांडण्यात आले आहे. हे विधेयक स्कर्ट किंवा इतर कपड्यांमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो काढण्याशी संबंधित आहे. हे विधेयक जनतेच्या मागणीवरून संसदेत आणण्यात आले आहे.

विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल. या अंतर्गत दोषी आढळलेल्या व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि लाखो रुपयांचा दंड भरावा लागेल. प्रत्यक्षात हे विधेयक आणण्यामागे अपस्कर्टिंगसारखे महिलांशी संबंधित गुन्हे थांबवणे हा उद्देश आहे.

ब्रिटन आणि युरोपातील अनेक देशांनी याला यापूर्वीच बलात्काराच्या श्रेणीत टाकले आहे.

काय आहे Upskirting ?

जगातील अनेक देशांमध्ये महिला स्कर्ट घालतात. अनेकदा लहान स्कर्टमध्ये सार्वजनिक ठिकाणी काही लोक या महिलांचे फोटो क्लिक करतात. मग ते फोटोज पॉर्न वेबसाइटला विकले जातात किंवा रिव्हेंज पॉर्न अंतर्गत संबंधित महिलेच्या बदनामीसाठी वापरले जातात.

याला अपस्कर्टिंग म्हणतात. जपानमध्येही आता हा प्रकार बलात्काराच्या श्रेणीत समाविष्ट केला जात आहे. स्थानिक भाषेत म्हणजे जपानी भाषेत त्याला 'चिकन' म्हणतात.

'जपान टुडे'च्या वृत्तानुसार, गर्दीच्या ठिकाणी, चित्रपटगृहे आणि स्टेडियममध्ये असे गुन्हे अनेकदा घडतात. जपानमधील जगप्रसिद्ध मेट्रो ट्रेनमध्ये अशी सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. येथे घाईघाईत महिलांना कपडे सांभाळता येत नसल्याने अनेक महिला गुन्हेगारी वृत्तीच्या पुरूषांच्या घाणेरड्या मानसिकतेला बळी पडतात.

विधेयकात काय म्हटले आहे?

जपानमधील प्रसारमाध्यमे, सामान्य जनता आणि सर्व खासदार या विधेयकाच्या बाजूने आहेत. याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. जामिनासाठी कडक अटी लागू राहतील. सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करून त्याची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल.

दोषी आढळल्यास किमान शिक्षा तीन वर्षे आणि 18 लाख रुपये दंड होऊ शकतो. दंड न भरल्यास आणखी एक वर्षाची शिक्षा भोगावी लागेल.

जपानच्या पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2010 मध्ये अशा एकूण 1741 प्रकरणांची नोंद झाली होती. 2021 मध्ये हा आकडा वाढून 5 हजार झाला. आता हा आकडा 8 ते 10 हजारांच्या दरम्यान असल्याचे मानले जात आहे.

काय आहेत इतर देशातील कायदे?

दरम्यान, अपस्कर्टिंगला बलात्काराच्या श्रेणी?त आणणारा जपान हा पहिला आशियाई देश आहे. दक्षिण कोरियामध्ये पाच वर्षांच्या तुरुंगवासासह, दोषींना 6 लाख रुपयांचा दंडदेखील भरावा लागतो. सिंगापूरमध्ये 2 वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशी तरतूद आहे. जर पीडितेचे वय 14 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असेल तर दोषीला शिक्षा भोगावी लागेल.

ब्रिटन आणि जर्मनीमध्ये 2 वर्षांची शिक्षा निश्चित आहे. यूएस आणि ऑस्ट्रेलियामधील वैयक्तिक राज्यांमध्ये अशा गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी कायदे आहेत. मध्यंतरी स्पेनमधील एका व्यक्तीच्या फोनमध्ये अपस्कर्टिंगचे 500 व्हिडिओ सापडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT