लिस्टेरियाचे भय! संपूर्ण यूकेमधून कॅडबरी, चॉकलेट, डेझर्ट्स मागवले परत

यूकेमधून एक मोठी बातमी समोर येत आहे.
Cadbury Chocolate
Cadbury ChocolateDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Cadbury Chocolate: यूकेमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. लिस्टेरियाच्या भीतीने हजारो कॅडबरी उत्पादने यूकेतील स्टोअरमधून हटवण्यात आली आहेत. स्काय न्यूजने म्हटले आहे की, ज्या लोकांनी अशा स्टोअरमधून कॅडबरी उत्पादने खरेदी केली आहेत, त्यांना ते न खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल (CDC) नुसार, लिस्टेरिया एक संसर्गजन्य रोग आहे (ज्याला लिस्टेरिओसिस म्हणतात). सामान्यत: लिस्टेरिया मोनोसाइटोजेन्सचा संसर्ग दूषित अन्नपदार्थ खाल्ल्याने होतो. गर्भवती महिला (Women) आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना या संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे, कारण विषाणू रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतात.

Cadbury Chocolate
Russia-Ukraine War: युक्रेन युद्धात रशियाचे मोठे नुकसान, पाच महिन्यांत 20 हजार रशियन सैनिक ठार; अमेरिकेचा दावा

दुसरीकडे, यूकेची फूड स्टँडर्ड्स एजन्सी (FSA) ग्राहकांना (Customers) उत्पादनांची कालबाह्यता तारीख तपासण्याचे आवाहन करत आहे. एजन्सीने क्रंची, डेम, फ्लेक, डेअरी मिल्क बटन्स आणि डेअरी मिल्क चंक्स 75 ग्रॅम चॉकलेट डेझर्ट्सबाबत अलर्ट जारी केला आहे, असे स्काय न्यूजने वृत्त दिले.

Cadbury Chocolate
Russia Ukraine War: युक्रेनियन लष्कराचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला, मॉस्कोमध्ये घबराट

तसेच, लिस्टेरिया मोनोसाइटोजेन्सच्या संभाव्य धोक्यामुळे सावधगिरीचा इशारा, FSA ने जारी केलेल्या निवदेनात दिला आहे. लिस्टिरिओसिसची लक्षणे फ्लूसारखीच असतात.

सीडीसीनुसार, त्यात ताप येणे, स्नायू दुखणे, वेदना होणे, थंडी वाजून येणे, थकवा जाणवणे आणि अतिसार यांचा समावेश होतो.

क्वचित प्रसंगीच, संसर्गाचा अधिक गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे मेंदुज्वर सारख्या गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो. जर गर्भवती महिलेला लिस्टिरियोसिसचा संसर्ग झाल्यास गर्भपाताचा धोका संभवू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India Women Cricket Team
donald trump mojtaba khamenei
AI Chatbot False Intelligence Report US China War
US Iran War End Donald Trump Peace Deal Statement
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com