Corona

 

Dainik Gomantak 

ग्लोबल

ओमिक्रॉनमुळे ब्रिटनमध्ये गेला पहिला बळी!

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी सांगितले की, ओमिक्रॉनची लागण झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

ब्रिटनमध्ये (Britain) कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटमुळे पहिला मृत्यू झाला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी सोमवारी सांगितले की, ओमिक्रॉनची लागण झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, ओमिक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ब्रिटनने देशात लसीचे बूस्टर डोस लागू करण्याचा कार्यक्रम सुरु केला आहे.

रविवारी कोरोनाच्या पुढील लाटेचा इशारा देणाऱ्या जॉन्सन यांनी पत्रकारांना सांगितले की, "ओमिक्रॉनमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, ही दुःखद बाब आहे."

विशेष म्हणजे, इंग्लंडमध्ये 30 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी कोरोना लसीच्या बूस्टर डोससाठी सोमवारपासून बुकिंग सुरु झाली आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. इंग्लंडच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा (NHS) ने सांगितले की, देशात 30 ते 39 वयोगटातील 7.5 दशलक्ष लोक आहेत, त्यापैकी 3.5 दशलक्ष सोमवारपासून बूस्टर डोससाठी पात्र आहेत. Omicron फॉर्मवर बूस्टर डोसच्या परिणामकारकतेबद्दल प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्रॉन संक्रमित लोकांना रुग्णालयात दाखल केल्याची प्रकरणेही देशात येऊ लागली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कायद्याचा बडगा की केवळ दिखावा? लुथरांच्या सुटकेसाठी 'पहिली चाल' खेळली गेली का? - संपादकीय

SMAT Final 2025: हरियाणा की झारखंड? कोण उंचावणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी? फायनल सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Goa News Live: जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Goa Weather: राज्यात असंतुलित हवामान, आजारात वाढ शक्य; डॉक्टरांकडून काळजी घेण्याचं आवाहन

Vasco Fish Market: प्रतीक्षा संपली! वास्कोतील मासळी मार्केट 29 पासून खुले, सध्याची जागा 28 पर्यंत खाली करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT